काश्मीरमध्ये साकारतोय जगातील सर्वात उंच रेल्वेपूल
By admin | Published: July 12, 2014 02:17 AM2014-07-12T02:17:46+5:302014-07-12T02:17:46+5:30
चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच रेल्वेपूल साकारण्यासाठी भारतीय अभियंते सध्या हिमालयाच्या कौरी भागात दिवसरात्र एक करीत आहेत.
Next
कौरी : चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच रेल्वेपूल साकारण्यासाठी भारतीय अभियंते सध्या हिमालयाच्या कौरी भागात दिवसरात्र एक करीत आहेत. पॅरिसच्या जगप्रसिद्ध आयफेल टॉवरपेक्षा हा पूल 35 मीटर उंच असेल. त्यासाठी जम्मू-काश्मीरच्या प्रेक्षणीय पर्वतराजीला जोडण्यासाठी चिनाब नदीवर सध्या गोलाकार कमानीच्या आकाराची (आर्च) पोलादी रचना उभारली जात आहे. 2क्16मध्ये या पुलाचे काम पूर्ण होईल.
हा पूल 359 मीटर (1177 फूट) उंच राहणार आहे. सध्या जगातील सर्वात उंच रेल्वेपूल चीनच्या गॉन्झाऊ प्रांतात बेईपानजियांग नदीवर असून, तो 275 मीटर उंचीचा आहे. भारतातील हा पूल डिसेंबर 2क्16मध्ये पूर्णत्वास येईल, असा दावा रेल्वेच्या एका ज्येष्ठ अधिका:याने केला आहे. भूगर्भातील हालचाली किंवा वेगवान वा:याचा परिणाम होऊ नये यासाठी त्याचे खास डिझाईन तयार करण्यात आले.
कोकण रेल्वेकडे जबाबदारी
कोकण रेल्वे कॉर्पोरेशनकडे या प्रकल्पाचे काम सोपविण्यात आले असून, 9.2 कोटी डॉलर्सचा खर्च अपेक्षित आहे. बारामुल्ला ते जम्मू हा भाग या पुलाने जोडला जाईल. हे अंतर पार करण्यास सध्याच्या तुलनेत निम्मा वेळ म्हणजे साडे सहा तास लागतील. नदीच्या दोन बाजूला दोन केबल क्रेनच्या साह्याने मेन आर्चची उभारणी केली जात असून, त्यासाठी पोलादी खांबाचा वापर केला जात आहे. पोलाद हलविण्यास हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे.