जगातील सर्वाधिक उंचीचा वाऴूचा 'सांताक्लॉज' भारतात

By admin | Published: December 24, 2015 08:31 PM2015-12-24T20:31:03+5:302015-12-24T20:33:37+5:30

जगभरातील अनेक शहरांमध्ये ख्रिसमसचा माहोल तयार झाला असून अनेक ठिकांणी सेलीब्रेशनचे आयोजन करण्यात आले आहे. ख्रिसमसच्या निमित्ताने पुरी येथील बीचवर ४५ फूट उंचीचा

World's tallest 'Santa Claus' in India | जगातील सर्वाधिक उंचीचा वाऴूचा 'सांताक्लॉज' भारतात

जगातील सर्वाधिक उंचीचा वाऴूचा 'सांताक्लॉज' भारतात

Next
>ऑनलाइन लोकमत
पुरी, दि. २४ - जगभरातील अनेक शहरांमध्ये ख्रिसमसचा माहोल तयार झाला असून अनेक ठिकांणी सेलीब्रेशनचे आयोजन करण्यात आले आहे. ख्रिसमसच्या निमित्ताने पुरी येथील बीचवर ४५ फूट उंचीचा वाऴूचा सांताक्लॉज उभारण्यात आला आहे. आर्टिस्ट सुदर्शन पट्टनाईक यांनी हा सांताक्लॉज साकारला असून जगातील सर्वात मोठा वाळूने साकारण्यात आलेला हा सांताक्लॉज असल्याचा त्यांनी दावा केला आहे.
पुरीच्या बीचवर सांताक्लॉज साकारण्यासाठी १००० टनपेक्षा जास्त वाळू वापरण्यात आली. तसेच, अनेक कलर वापरण्यात आले असून आर्टिस्ट सुदर्शन पट्टनाईक यांच्यासह सुदर्शन सॅन्ड ऑर्ट इन्सिट्युटच्या २० विद्यार्थ्यांनीही हा सांताक्लॉज बनविण्यास मेहनत घेतली. यांना हा प्रचंड मोठा वाळूचा सांताक्लॉज साकारण्यासाठी दोन दिवस लागले. आज संध्याकाळी या सांताक्लॉजचे अनावरण करण्यात आले असून येत्या एक जानेवारीपर्यंत प्रेक्षकांना पाहायला मिळाणार आहे.
आर्टिस्ट सुदर्शन यांनी सांताक्लॉजसोबतच येशू आणि मदर मेरी यांची प्रतिकृती साकारली आहे. दरम्यान, लिम्बा बुकमध्ये रेकॉर्ड करण्याचे मी आवाहन केले आहे. तसेच, आम्ही यंदाचा सांताक्लॉज साकारुन गेल्यावर्षीचे रेकॉर्ड तोडले असल्याचे आर्टिस्ट सुदर्शन पट्टनाईक यांनी सांगितले. 

Web Title: World's tallest 'Santa Claus' in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.