CoronaVirus News: कोरोना रुग्णालयात निकृष्ट जेवण; भाजी अन् डाळीत सापडले किडे, रुग्ण संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 08:55 AM2021-04-24T08:55:35+5:302021-04-24T08:57:13+5:30

CoronaVirus News: भाजी आणि डाळीत किडे सापडल्यानं रुग्ण संतप्त; जेवण फेकून देत घातला गोंधळ

Worms Found In Pulses And Vegetables In Covid Hospital uttar pradesh Hamirpur | CoronaVirus News: कोरोना रुग्णालयात निकृष्ट जेवण; भाजी अन् डाळीत सापडले किडे, रुग्ण संतापले

CoronaVirus News: कोरोना रुग्णालयात निकृष्ट जेवण; भाजी अन् डाळीत सापडले किडे, रुग्ण संतापले

Next

हमीरपूर: गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात पहिल्यांदा एका दिवसात कोरोनाच्या एक लाख नव्या रुग्णांची नोंद झाली. आता एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात हाच आकडा सव्वा लाखांवर गेला आहे. देशातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे. अनेक रुग्णालयांमध्ये सुविधांची बोंब आहे. त्यातच आता उत्तर प्रदेशातल्या एका कोविड रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला आहे.

आक्रोश....आई द्या हो, मला माझे बाबा हवेत!

उत्तर प्रदेशातल्या हमीरपूर जिल्ह्यातील कोविड रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रग्णांना निकृष्ट दर्जाचं जेवण देण्यात आलं. भाजी आणि डाळीत किडे आढळून आले. त्यामुळे कोरोना रुग्ण संतापले. त्यांनी जेवण फेकून देत गोंधळ घातला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून सीएमओनं प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

मोठा दिलासा! एप्रिलमध्ये प्रथमच बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

हमीरपूर जनपदच्या सुमेरपूरमध्ये असलेल्या पॉलिटेक्निक वसतीगृहाचं रुपांतर कोविड रुग्णालयात करण्यात आलं आहे. या ठिकाणी १३० कोरोना रुग्ण आहेत. काल सकाळी या रुग्णांना नाश्ता आणि चहा देण्यात आला. दुपारच्या जेवणात डाळ आणि पोळी देण्यात आली. एका रुग्णानं डाळीत पोळीचा तुकडा बुडवला. तर त्यात त्याला किडा दिसला. त्यानंतर त्यानं आरडाओरडा केला. सगळ्या रुग्मांनी त्यांच्या ताटातील डाळ आणि पोळी पाहिली. त्यातही किडे होते. यानंतर रुग्णालयात एकच गदारोळ झाला.

सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल
रुग्णांनी गोंधळ घातल्यामुळे कर्मचारी भांबावून गेले. यानंतर रुग्णांची समजूत काढण्यात आली. त्यांना भाजी दिली गेली. मात्र त्यातही किडे सापडले. त्यामुळे रुग्ण अधिकच संतापले. त्यांनी जेवण फेकून देत गोंधळ घातला. रुग्णालयात उपचार घेत असलेले टिकरौली गावचे रहिवासी बृजमोहन साहू यांनी घटनेचा व्हिडीओ चित्रित करून तो सोशल मीडियावर शेअर केला. यानंतर सीएमओनं प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले.

Read in English

Web Title: Worms Found In Pulses And Vegetables In Covid Hospital uttar pradesh Hamirpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.