देशाच्या भवितव्याबद्दल युवापिढीला वाटणारी चिंता योग्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 06:33 AM2019-12-25T06:33:18+5:302019-12-25T06:33:33+5:30
सीताराम येचुरी; सुवर्णपदक नाकारणाऱ्या रबिहाचे केले कौतुक; धाडसी भारतीयांमागे सर्वांनी उभे राहायला हवे
नवी दिल्ली : देशाच्या भवितव्याबद्दल युवापिढीला वाटणारी चिंता अतिशय योग्य आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात निदर्शने करणाºया विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेत पाँडेचरी विद्यापीठातील रबिहा अब्दुरहीम या विद्यार्थिनीने पाठिंबा दिला, तसेच शैक्षणिक गुणवत्तेबद्दल विद्यापीठाकडून मिळणारे सुवर्णपदक स्वीकारण्यास तिने नकार दिला, ही अतिशय योग्य कृती आहे, असे माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी म्हटले आहे.
रबिहा अब्दुरहिम ही विद्यार्थिनी मूळची केरळची असून, तिने पाँडेचरी विद्यापीठातून ‘मास कम्युनिशेकन’ या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी या विद्यापीठाच्या झालेल्या पदवीदान समारंभाला रबिहाला उपस्थित राहू देण्यात आले नव्हते. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात निदर्शने करणाºया विद्यार्थ्यांना तिने पाठिंबा दर्शविला होता. सीताराम येचुरी यांनी टष्ट्वीटमध्ये म्हटले आहे की, रबिहासारख्या धाडसी व देशभक्त भारतीयांमागे आपण सर्वांनी उभे राहायला हवे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात निदर्शने करणाºया व भारतात शिकण्यासाठी आलेल्या एका जर्मन युवतीला हा देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जनतेचा आवाज दडपला : ते म्हणाले की, राज्यघटनेमध्ये भारतीय संघराज्याची जी संकल्पना मांडली त्याच्या विसंगत चित्र सध्या दिसत नाही का? केंद्र सरकारने जनतेचा आवाज दडपण्याला काही मर्यादाच उरलेली नाही. मात्र, भारत व जगातील लोकांना नेमके काय चालले आहे, ते बरोबर माहिती आहे.