बनावट, दुय्यम दर्जाच्या औषधांविषयी चिंता
By admin | Published: March 31, 2017 01:09 AM2017-03-31T01:09:57+5:302017-03-31T01:09:57+5:30
बनावट, दुय्यम दर्जाची आणि मुदत संपलेली औषधे विकली जात असल्याबद्दल समाजवादी पक्षाने
नवी दिल्ली : बनावट, दुय्यम दर्जाची आणि मुदत संपलेली औषधे विकली जात असल्याबद्दल समाजवादी पक्षाने गुरुवारी राज्यसभेत तीव्र चिंता व्यक्त केली. त्यावर राज्य सरकारांना दर्जाच्या नियंत्रणाचे आणि कारवाई करण्याचे सगळे अधिकार असल्याचे उत्तर केंद्र सरकारतर्फे देण्यात आले.
नरेश अग्रवाल यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी म्हणाले की, बनावट, दुय्यम दर्जाच्या व मुदत संपलेल्या औषधांचा प्रश्न काळजीचा आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
९0 टक्के औषधे मुदत संपलेली
हा प्रश्न उपस्थित करताना अग्रवाल म्हणाले की, सामान्य माणसाला बाजारात विकल्या जात असलेल्या बनावट, दुय्यम दर्जाच्या व मुदत संपलेल्या औषधांचा मोठा प्रश्न भेडसावतो.
वस्तुस्थिती अशी आहे की ग्रामीण भागात विकली जाणारी ९० टक्के औषधे ही मुदत संपलेली असतात, असे नरेश अग्रवाल म्हणाले.