पाकच्या वैमानिकांनी खरंच राफेल विमानं उडवली?, 'हे' आहे सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 08:29 PM2019-04-11T20:29:39+5:302019-04-11T20:29:50+5:30
राफेल लढाऊ विमानांवरून काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
नवी दिल्लीः राफेल लढाऊ विमानांवरून काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्याच दरम्यान एक नवीच बाब समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान स्वतःच्या वैमानिकांना राफेल लढाऊ विमान उडवण्याचं प्रशिक्षण देत आहे. परंतु राफेल लढाऊ विमानं तयार करणारी फ्रान्समधील दसॉ एव्हिएशननं हा दावा फेटाळून लावला आहे.
भारतात असलेल्या फ्रान्सच्या राजदूतांनीही हे वृत्त खोडून काढलं आहे. एका एक्सचेंज प्रोग्रामअंतर्गत पाकिस्तानी वैमानिकांना कतार एअरफोर्सकडून राफेल लढाऊ विमानं उडवण्याचं ट्रेनिंग फ्रान्समध्येच देण्यात आलं होतं. दुसरीकडे एव्हिएशन सेक्टरमध्येही या वृत्तानं खळबळ उडाली आहे. पाकिस्तानी वैमानिकांना नोव्हेंबर 2017मध्ये ट्रेनिंग देण्यात आली. भारतात फ्रान्सचे असलेले राजदूत अलेक्झांडर झीगरल यांनी हे वृत्त निराधार असल्याचं म्हटलं आहे.
French Ambassador to India Alexandre Ziegler rejects media report that Pakistani Air Force pilots were trained on Rafale jets , says 'I can confirm that it is fake news' pic.twitter.com/x76gUrP6My
— ANI (@ANI) April 11, 2019
ट्विट करत ते म्हणाले, मी सांगू शकतो की ही फेक न्यूज आहे. काही दशकांपूर्वी पाकिस्तान स्वतःच्या वैमानिक आणि सैन्य अधिकाऱ्यांना मीडिल ईस्ट देशांतील सैन्याबरोबर युद्धसराव करण्यासाठी पाठवत होता. जॉर्डननंही एफ 16 लढाऊ विमानं पाकिस्तानकडे सोपवली होती. भारतावर करण्यात आलेल्या हल्ल्यात याच विमानांचा वापर करण्यात आल्याचीही चर्चा आहे.