चिंताजनक! ऑक्टाेबर महिन्यामध्ये बेराेजगारीचा दर वाढला, ‘सीएमआयई’ने केली आकडेवारी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 12:59 AM2020-11-03T00:59:45+5:302020-11-03T06:42:32+5:30
CMIE : ‘सीएमआयई’च्या आकडेवारीनुसार ऑक्टाेबरमध्ये बेराेजगारीचा दर 6.98 टक्के एवढा हाेता. तर सप्टेंबरमध्ये हाच दर 6.67 टक्के हाेता.
नवी दिल्ली : एकीकडे अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे शुभसंकेत मिळत असतानाच दुसरीकडे ऑक्टाेबरमध्ये बेराेजगारीचे प्रमाण वाढल्याचे एका आकडेवारीतून समाेर आले आहे. सेंटर फाॅर माॅनिटरींग इंडियन इकाॅनाॅमी अर्थात ‘सीएमआयई’ने यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे.
‘सीएमआयई’च्या आकडेवारीनुसार ऑक्टाेबरमध्ये बेराेजगारीचा दर 6.98 टक्के एवढा हाेता. तर सप्टेंबरमध्ये हाच दर 6.67 टक्के हाेता. काेराेना महामारीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला माेठा फटका बसला आहे. परिणामी बेराेजगारीत माेठ्या प्रमाणात वाढ झाली. बेराेजगारीचा सर्वाधिक दर एप्रिलमध्ये 23.52 टक्के हाेता. त्यानंतर मे मध्ये त्यात थाेडी घट झाली हाेती. सरकारने ‘अनलाॅक’साठी पावले उचलल्यानंतर बेराेजगारीच्या प्रमाणात माेठी घट झालेली ‘सीएमआयई’च्या आकडेवारीत दिसून आले.
अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी केंद्र सरकारने विविध उपाययाेजना राबविल्या आहेत. त्याचे काही सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. ‘अनलाॅक’नंतर आर्थिक व्यवहार वाढले असून ऑक्टाेबरमध्ये विक्रमी जीएसटी संकलन झाले. उद्याेगधंदे सुरु झाल्याचा हा परिणाम आहे.
आकडे बाेलतात,बेराेजगारीचा दर
ऑक्टाेबर - 6.98
सप्टेंबर - 6.67
ऑगस्ट- 8.35
जुलै - 7.40
जून - 10.18
मे - 21.73
एप्रिल - 23.52