'व्हॅलेंटाइन डे'ला आई-वडिलांची पूजा करा, जिल्हाधिका-यांची नोटीस
By admin | Published: February 10, 2017 07:09 PM2017-02-10T19:09:23+5:302017-02-12T06:15:47+5:30
येणारा 'व्हॅलेंटाइन डे' संपूर्ण जगभरातील प्रेमी युगल साजरा करताना दिसेल. मात्र, त्या दिवशी मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात एका वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - येणारा 'व्हॅलेंटाइन डे' संपूर्ण जगभरातील प्रेमी युगल साजरा करताना दिसेल. मात्र, त्या दिवशी मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात एका वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आदेश येथील जिल्हाधिका-यांनी दिले आहे.
छिंदवाडा जिल्ह्यातील जिल्हाधिका-यांनी एक नोटीस जारी केली असून यामध्ये युवकांनी 'व्हॅलेंटाइन डे' साजरा करण्याऐवजी त्या दिवशी आई-वडिलांची पूजा करा, असे म्हटले आहे. जिल्ह्यातील सर्व शालेय आणि सामाजिक संस्थांमधून 14 फेब्रुवारी आई-वडिलांच्या पूजेचा दिवस म्हणून साजरा करण्यात यावा. तसेच, घरात, कुटुंबात, गल्लीत, गावात आणि शहरांमधून या कार्यक्रमाचे आयोजन केल्यास या संकल्पनेला निश्चितच चांगला प्रतिसाद मिळेल, असेही म्हटले आहे.
दरम्यान, सध्या बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या आसाराम बापूने गेल्या वर्षांपूर्वी 'व्हॅलेंटाइन डे'च्याऐवजी हा दिवस आई-वडिलांच्या पूजेचा दिवस म्हणून साजरा केला होता. तर 'व्हॅलेंटाइन डे'ला योगगुरु रामदेव बाबा, बजरंग दल अशा अनेक संघटनांनी विरोध दर्शविला आहे.