...त्यापेक्षा मरणं पसंत करेन; प्रियंका गांधींचा 'आर या पार'चा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 09:46 AM2019-05-03T09:46:58+5:302019-05-03T09:48:44+5:30
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी मायावतींनी केलेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
नवी दिल्लीः काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी मायावतींनी केलेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मायावतींनी काँग्रेस आणि भाजपा एकाच ताटाच्या दोन बाजू आहेत. काँग्रेसला मत देणं म्हणजे आपलं मत बरबाद करण्यासारखं आहे. काँग्रेस अप्रत्यक्षरीत्या भाजपाला फायदा पोहोचवत असल्याचा आरोप मायावतींनी केला होता. त्यावर प्रियंका गांधी म्हणाले, भाजपाला फायदा पोहोचवण्याऐवजी मी मरणं पसंत करेन, मी कधीही अशा जहाल आणि विध्वंसक विचारधारेशी समझोता करणार नाही. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस उमेदवारांना भाजपाची मतं मिळत असल्याचंही प्रियंका गांधींनी सांगितलं आहे.
कालच समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाला रोखण्यासाठी काँग्रेस आणि भाजप युती करून उत्तर प्रदेशात निवडणुकीला सामोरे जात असल्याचा आरोप मायवाती यांनी केला होता. एक सभेत त्या बोलत होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी बहुजन समाजपक्षाची निर्मिती झाली. भाजपाने देखील काँग्रेसप्रमाणे नकली आंबेडकरवादी होण्याची उठाठेव सुरू केली आहे. ही उठाठेव भाजपाने करू नये, असा सल्ला मायवती यांनी दिला होता. तसेच बसपा आणि सपा युतीसंदर्भात काँग्रेसकडून देखील वाटेल ते वक्तव्य करण्यात येत आहे.
यावरून काँग्रेस आणि भाजपने आपापसात युती केल्याची उघड होते, असंही मायावती यांनी म्हटले होते. त्यावेळी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी म्हटले होते की, उत्तर प्रदेशात काँग्रेसने मजबूत उमेदवारी दिले आहेत. सगळेच उमेदवार जिंकतील, काही जिंकू शकले नाही, तरी ते भाजपला नुकसान करतील, असंही प्रियंका यांनी सांगितले होते. यावर मायवती म्हणाल्या की, काँग्रेसचे अधिकाअधिक उमेदवार भाजपाला फायदा पोहोचविण्यासाठीच आहे. तर सप-बसपचं रिमोट कंट्रोल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात असल्याचे बुधवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले होते.