Wrestler Protest: बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाट; कोणाकडे किती आणि कोणते मेडल? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 07:18 PM2023-05-31T19:18:04+5:302023-05-31T19:20:15+5:30

भाजप खासदार आणि कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे.

Wrestler Protest: Bajrang Punia, Sakshi Malik and Vinesh Phogat; Who has how many and which medals? Find out | Wrestler Protest: बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाट; कोणाकडे किती आणि कोणते मेडल? जाणून घ्या...

Wrestler Protest: बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाट; कोणाकडे किती आणि कोणते मेडल? जाणून घ्या...

googlenewsNext

Wrestler Protest: भाजप खासदार आणि कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी दिग्गज कुस्तीपटू मंगळवारी गंगेत पदक विसर्जित करणार होते. हरिद्वार येथे मंगळवारी वेगळेच दृश्य होते. गंगा दसरा होता, हजारोंचा जमाव आला होता. या गर्दीत बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांच्यासह अनेक मोठे खेळाडू उपस्थित होते. मात्र, नंतर त्यांनी आपला निर्णय पाच दिवसांसाठी पुढे ढकलला. अशा परिस्थितीत या खेळाडूंच्या नावे किती पदके आहेत, हे जाणून घेऊ...

साक्षी मलिकने गंगेच्या काठावर पोहोचण्यापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. यात तिने लिहिले की, 'पदक हे आमचे जीवन आहे, आमचा आत्मा आहे. ते गंगेत वाहिल्यावर आमचा जगण्यात काहीच अर्थ उरणार नाही. त्यामुळे आम्ही इंडिया गेटवर आमरण उपोषणाला बसणार आहोत.' विनेश फोगटनेही साक्षी मलिकची ही पोस्ट शेअर केली आहे.

याआधी रविवारी या खेळाडूंना दिल्ली पोलिसांनी जंतरमंतर येथून हटवले होते. पोलिसांनी या तिन्ही पैलवानांसह अनेकांवर गुन्हाही दाखल केला आहे. रविवारी पोलिसांनी या खेळाडूंना ताब्यातदेखील घेतले होते. रात्री त्यांना सोडून देण्यात आले. दरम्यान, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकली आहेत, तर विनेश फोगटने जागतिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे.

कोणत्या खेळाडुकडे किती पदके आहेत?

1. बजरंग पुनिया

ऑलिम्पिक

  • टोकियो ऑलिम्पिक 2020 (65 किलो): कांस्य

जागतिक अजिंक्यपद

  • बुडापेस्ट 2018 (65 किलो): रौप्य
  • बुडापेस्ट 2013 (60 किलो): कांस्य
  • नूर-सुलतान 2019 (65 किलो): कांस्य
  • बेलग्रेड 2022 (65 किलो): कांस्य

आशियाई खेळ

  • जकार्ता 2018 (65 किलो): सुवर्ण
  • इंचॉन 2014 (61 किलो): रौप्य
  • नवी दिल्ली 2017 (65 किलो): सुवर्ण
  • शियान 2019 (65 किलो): सुवर्ण
  • अस्ताना 2014 (61 किलो): रौप्य
  • नवी दिल्ली 2020 (65 किलो): रौप्य
  • अल्माटी 2021 (65 किलो): रौप्य
  • उलानबाटर 2022 (65 किलो): रौप्य
  • नवी दिल्ली 2013 (60 किलो): कांस्य
  • बिशेक 2018 (65 किलो): कांस्य

राष्ट्रकुल खेळ

  • गोल्ड कोस्ट 2018 (65 किलो): सुवर्ण
  • बर्मिंगहॅम 2022 (65 किलो): सुवर्ण
  • ग्लासगो 2014 (61 किलो): रौप्य

कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप

  • ब्रेकपेन 2017 (65 किलो): सुवर्ण
  • सिंगापूर 2016 (65 किलो): सुवर्ण

2. साक्षी मलिक

ऑलिम्पिक

  • रिओ ऑलिम्पिक 2016 (58 किलो): कांस्य

राष्ट्रकुल खेळ

  • बर्मिंगहॅम 2022 (62 किलो): सुवर्ण
  • ग्लासगो 2014 (58 किलो): रौप्य
  • गोल्ड कोस्ट 2018 (62 किलो): कांस्य

आशियाई चॅम्पियनशिप

  • दोहा 2015 (60 किलो): कांस्य
  • नवी दिल्ली 2017 (60 किलो): रौप्य
  • बिशेक 2018 (62 किलो): कांस्य
  • शियान 2019 (62 किलो): कांस्य

कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप

  • जोहान्सबर्ग 2013 (63 किलो): कांस्य
  • जोहान्सबर्ग 2016 (62 किलो): सुवर्ण

3. विनेश फोगट

  • जागतिक अजिंक्यपद
  • बेलग्रेड 2022 (53 किलो): कांस्य
  • नूर-सुलतान 2019 (53 किलो): कांस्य
  • जकार्ता 2018 (50 किलो): सुवर्ण
  • इंचॉन 2014 (48 किलो): कांस्य

राष्ट्रकुल खेळ

  • ग्लासगो 2014 (48 किलो): सुवर्ण
  • गोल्ड कोस्ट 2018 (50 किलो): सोने
  • बर्मिंगहॅम 2022 (53 किलो): सुवर्ण

आशियाई चॅम्पियनशिप

  • अल्माटी 2021 (53 किलो): सोने
  • दोहा 2015 (48 किलो): रौप्य
  • नवी दिल्ली 2017 (55 किलो): रौप्य
  • बिश्केक 2018 (50 किलो): रौप्य
  • नवी दिल्ली 2013 (51 किलो): कांस्य
  • बँकॉक 2016 (53 किलो): कांस्य
  • शियान 2019 (53 किलो): कांस्य
  • नवी दिल्ली 2020 (53 किलो): कांस्य

या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

बजरंग पुनिया: 2019 मध्ये पद्मश्री आणि खेलरत्न पुरस्काराने सन्मानित. 2015 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

साक्षी मलिक : 2017 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित. यापूर्वी 2016 मध्ये खेलरत्न पुरस्कार मिळाला होता.

विनेश फोगट: 2020 मध्ये सरकारने खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले. 2016 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Web Title: Wrestler Protest: Bajrang Punia, Sakshi Malik and Vinesh Phogat; Who has how many and which medals? Find out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.