पदकं गंगेत सोडणार, इंडिया गेटवर आमरण उपोषण करणार, कुस्तीपटूंकडून आरपारच्या लढ्याची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 04:05 PM2023-05-30T16:05:15+5:302023-05-30T16:09:54+5:30

Wrestler Protest News: साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंह पुनिया यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आज संध्याकाळी हरिद्वार येथे आपली पदके गंगेत सोडण्याची आणि नंतर इंडिया गेटवर आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे.

Wrestler Protest: Medals will be left in the Ganges, fast to death at India Gate, wrestlers will announce fight | पदकं गंगेत सोडणार, इंडिया गेटवर आमरण उपोषण करणार, कुस्तीपटूंकडून आरपारच्या लढ्याची घोषणा 

पदकं गंगेत सोडणार, इंडिया गेटवर आमरण उपोषण करणार, कुस्तीपटूंकडून आरपारच्या लढ्याची घोषणा 

googlenewsNext

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटूंनी आता आरपारच्या संघर्षाची भूमिका घेतली आहे. आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनी आपल्याकडील पदके गंगेत सोडण्याची घोषणा केली आहे. साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंह पुनिया यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आज संध्याकाळी हरिद्वार येथे आपली पदके गंगेत सोडण्याची आणि नंतर इंडिया गेटवर आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे.

साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी ट्विटरवर एक पत्र शेअर केलं आहे. या पत्रामध्ये लिहिलं आहे की, आम्ही ही पदके गंगेत सोडण्यासाठी निघालो आहोत. कारण ती गंगा माता आहे. जेवढं आम्ही गंगेला पवित्र मानतो. तितक्याच पवित्रतेने आम्ही मेहनत करून ही पदके मिळवली होती. ही पदके संपूर्ण देशासाठी पवित्र आहेत. तसेच ही पवित्र पदके ठेवण्याची योग्य जागा ही गंगा माताच असू शकते. आमचा मुखवटा वापरून फायदा घेतला गेला. त्यानंतर आमच्या शोषकासोबत उभी राहिलेली आमची व्यवस्था अपवित्र आहे.

यावेळी २८ मे रोजी घडलेल्या घटनेबाबतही या कुस्तीपटूंनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या पत्रात सांगितले की, २८ मे रोजी जे काही घडलं. ते तुम्ही सर्वांनी पाहिलं आहे. पोलीस आमच्यासोबत कसे वागले, आम्हाला किती क्रूरतेने अटक करण्यात आली, हेही सर्वांनी पाहिलंय. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो. मात्र आमच्या आंदोलनाची जागाही पोलिसांनी उद्ध्वस्त केली. तसेच दुसऱ्या दिवशी गंभीर कलमांखाली आमच्यावर एफआयआर दाखल करण्यात आली. महिला कुस्तीपटूंनी आपल्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाविरोधात न्याय मागून कुठला गुन्हा केला आहे का? पोलीस आणि तंत्र आमच्यासोबत गुन्हेगारांसारखं वर्तन करत आहेत. तर आरोपी मोकाटपणे आमची चेष्टा करत आहेत. टीव्हीवर महिला कुस्तीपटूंना अस्वस्थ करणाऱ्या घटानांबाबत बोलून त्यांची टर उडवत आहे.  

Web Title: Wrestler Protest: Medals will be left in the Ganges, fast to death at India Gate, wrestlers will announce fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.