Wrestlers Protest: कुस्तीपटू गीता फोगटला पोलिसांनी घेतले ताब्यात; जंतर-मंतरवर जाताना कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 07:05 PM2023-05-04T19:05:46+5:302023-05-04T19:06:31+5:30
गीता फोगाट आणि तिचे पती पवन सरोहा जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या पैलवानांना पाठिंबा देण्यासाठी जात होते.
गेल्या अनेक दिवसांपासून राजधानी दिल्लीतील जंतर मंतरवर देशातील दिग्गज पैलवानांचे आंदोलन सुरू आहे. अनेक खेळाडूंनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. यातच आता आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी जंतर मंतरकडे जाणाऱ्या गीता फोगटला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दिल्ली पुलिस की मनमानी
— geeta phogat (@geeta_phogat) May 4, 2023
मुझे जंतर- मंतर पर मेरे भाई-बहनों से मिलने जाने के लिए भी रोक दिया गया
पुलिस कह रही है की दो ही रास्ते हैं या तो अपने घर वापिस जाओ या फिर पुलिस के घर चलो
बेहद निंदनीय pic.twitter.com/yKbUT3LOwq
आज(दि. 4 मे) राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेती गीता फोगट आणि तिचा पती पवन सरोहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. खुद्द गीता फोगट हिने ट्विट करुन ही माहिती दिली. तिने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'मला आणि माझे पती पवन सरोहा यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. हे खूप दु:खद आहे.’ याआधी तिने ट्विट करत गाडी कर्नाल बायपासवर पोलिसांनी अडवल्याची माहिती दिली होती.
मुझे और मेरे पति पवन सरोहा को दिल्ली पुलिस ने गिरफ़्तार कर लिया है।
— geeta phogat (@geeta_phogat) May 4, 2023
बहुत दुःखद
गीता फोगट जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासाठी जात होती. दिल्ली पोलिसांनी दोघांना सिंघू सीमेवर ताब्यात घेतले. यानंतर त्यांना बवाना पोलिस ठाण्यात नेण्यात आले. बुधवारी मध्यरात्री जंतरमंतरवर झालेल्या गोंधळानंतर कुस्तीपटूंसह विविध स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
यापूर्वी गीता फोगटचे वडील आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महावीर फोगट यांनी न्याय न मिळाल्यास दिल्लीला घेराव घालू, अशी घोषणा केली होती. द्रोणाचार्य पुरस्कार परत करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या लढाईत त्यांची धाकटी मुलगी आणि भाजप नेत्या बबिता फोगटही सोबत असल्याचा दावा महावीर फोगट यांनी केला आहे.