अश्रूंचा बांध फुटला! 'चॅम्पियन' पैलवान गंगा तीरावर दाखल; पदकांचं 'सोनं' गंगेत करणार विसर्जित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 06:37 PM2023-05-30T18:37:56+5:302023-05-30T19:31:12+5:30
Wrestlers Protest : देशातील नामांकित पैलवानांनी जिंकलेली पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला.
हरिद्वार : देशातील नामांकित पैलवांनाचा अखेर सयंम सुटला असून त्यांनी जागतिक पातळीवर जिंकलेली पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी सकाळी आंदोलक पैलवानांनी केलेल्या घोषणेनुसार, सायंकाळी उत्तराखंडमधील हरिद्वार येथे ही पदकं विसर्जित करण्यासाठी ते दाखल झाले आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध आंदोलक पैलवानांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
पदकं हेच आमचे जीवन असून ती गंगेत वाहून गेल्यावर आमच्या जगण्याला अर्थ उरणार नाही, त्यामुळे आम्ही इंडिया गेटवर आमरण उपोषणाला बसू, असंही पैलवानांनी सांगितले.
#WATCH | Crowd gathers around protesting wrestlers in Haridwar who have come to immerse their medals in river Ganga as a mark of protest against WFI chief and BJP MP Brij Bhushan Sharan Singh over sexual harassment allegations. #WrestlersProtestpic.twitter.com/YhN1oxOFtr
— ANI (@ANI) May 30, 2023
पैलवानांना अश्रू अनावर
#WATCH | Protesting Wrestlers in Haridwar to immerse their medals in river Ganga as a mark of protest against WFI chief and BJP MP Brij Bhushan Sharan Singh over sexual harassment allegations. #WrestlersProtestpic.twitter.com/4kL7VKDLkB
— ANI (@ANI) May 30, 2023
रविवारी एकिकडे नवीन संसद भवनाचं उद्घाटन पार पडलं, तर दुसरीकडे या नव्या वास्तूसमोर आंदोलक करत असलेल्या पैलवानांची दिल्ली पोलिसांनी धरपकड केली. पैलवानांचे आंदोलन दडपल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. खरं तर पैलवानांवर दिल्ली पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हे देखील दाखल केले आहेत.
२३ एप्रिलपासून आंदोलन सुरू
ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांसह देशातील नामांकित पैलवानांनी २३ एप्रिलपासून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनाला एक महिना झाला असून अद्याप तोडगा निघाला नाही. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) माजी अध्यक्षांनी अनेक मुलींचा लैंगिक छळ केला आहे, असे गंभीर आरोप महिला पैलवानांनी केले आहेत. दिल्लीत रविवारी नवीन संसद भवनासमोर आंदोलक करू इच्छित करू पाहणाऱ्या पैलवानांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याशिवाय विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.