लिपिकाचा कार्यालयातच ह्दयविकाराने मृत्यू

By admin | Published: February 5, 2016 10:22 PM2016-02-05T22:22:24+5:302016-02-05T22:22:24+5:30

फोटो

Writer's death in the office of cardiac arrest | लिपिकाचा कार्यालयातच ह्दयविकाराने मृत्यू

लिपिकाचा कार्यालयातच ह्दयविकाराने मृत्यू

Next
टो
जळगाव: तापी जलविद्युत व उपसा सिंचन या कार्यालयातील टंकलेखक व कनिष्ठ लिपीक आशुतोष सुधीर क्षीरसागर (वय ४२ रा.नाशिक ह.मु.महाबळ, जळगाव) यांचा शुक्रवारी सकाळी दहा वाजता कार्यालयातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. क्षीरसागर हे मूळचे नाशिक येथील आहेत. नोकरीनिमित्त ते महाबळ कॉलनीत आईसह वास्तव्याला होते. नियमितप्रमाणे ते सकाळी दहा वाजता कार्यालयात आले. हजेरी पुस्तकावर सही करीत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते जमिनीवर कोसळले. काही क्षणातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने कर्मचार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळावर आईचा आक्रोश मन हेलावणारा होता. क्षीरसागर हे अविवाहित होते.त्यांच्या प›ात आई, भाऊ व वहिणी असा परिवार आहे.

रेमंड कंपनीजवळ वृध्दाचा मृत्यू
जळगाव: एमआयडीसीतील रेमंड कंपनीच्या लंच हॉलमध्ये गुरुवारी दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी राजेंद्र कडू पाटील (वय ५५ रा.मारोती पेठ) यांचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत्यूचे कारण समजू शकले नाही. वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय कुरकुरे यांच्या माहितीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Writer's death in the office of cardiac arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.