मुलाचे गुण वाढविणार्या लिपिकावर गुन्हा दाखल उमवि : गुणात खाडाखोड करुन परिक्षकाची केली बनावट स्वाक्षरी
By admin | Published: May 20, 2016 12:41 AM2016-05-20T00:41:30+5:302016-05-20T00:41:30+5:30
जळगाव: प्रात्यक्षिक परीक्षेच्या उत्तर पत्रिकेत खाडाखोड करुन मुलाचे गुण वाढविणार्या संतोष बाबुलाल चव्हाण या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील परीक्षा विभागातील वरिष्ठ लिपिकाविरुध्द गुरुवारी धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपकुलसचिव ज्ञानदेव बाजीराव नीलवर्ण (वय ५७ रा.दादावाडी, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
Next
ज गाव: प्रात्यक्षिक परीक्षेच्या उत्तर पत्रिकेत खाडाखोड करुन मुलाचे गुण वाढविणार्या संतोष बाबुलाल चव्हाण या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील परीक्षा विभागातील वरिष्ठ लिपिकाविरुध्द गुरुवारी धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपकुलसचिव ज्ञानदेव बाजीराव नीलवर्ण (वय ५७ रा.दादावाडी, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे.संतोष चव्हाण हा विद्यापीठात परीक्षा विभागात वरिष्ठ लिपिक आहे. त्याचा मुलगा स्वप्नील हा मू.जे.महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या दुसर्या वर्गात शिक्षण घेत आहे. विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या प्रात्यक्षिक परीक्षेत मुलगा स्वप्नील याला १५ गुण मिळाले होते. चव्हाण यांनी २८ मार्च ते १५ मे २०१६ या दरम्यान कार्यालयीन वेळेत उत्तर पत्रिका तपासणीचे काम सुरु आहे. या काळात चव्हाण यांनी स्वप्नीलच्या गुण पत्रिकेत खाडाखोड करुन १५ वरुन ४५ गुण केले व परीक्षक वाय.पी.पाटील यांची बनावट स्वाक्षरी केली. परीक्षा विभागातील घोलप नावाचा कर्मचारी रजेवर असल्याने त्यांनी चव्हाण यांच्या ताब्यात उत्तरपत्रिका सोपविल्या होत्या.हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कुलगुरु प्रा.डॉ.सुधीर मेश्राम यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर उपसचिव ज्ञानदेव बाजीराव नीलवर्ण यांनी पाळधी दूरक्षेत्र गाठून सहायक निरीक्षक विजय देशमुख यांची भेट घेवून फिर्याद दिली आहे. चव्हाण यांच्याविरुध्द कलम ४२०, ४६४, ४६५ व ४६८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. तपास शामकुमार मोरे व अतुल वंजारी करीत आहेत.