'चुकीच्या बातम्या पसरविण्यात येत आहेत, अफवांवर विश्वास ठेऊ नका'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 07:52 PM2019-05-01T19:52:52+5:302019-05-01T19:54:29+5:30

हिमाचल प्रदेशच्या किनौरमधील सांगला येथे प्रचारसभा आटोपल्यानंतर नितिन गडकरी कुफरीला परतत होते.

'Wrong news is being spread, do not believe in rumors' Nitin gadkari twitter says | 'चुकीच्या बातम्या पसरविण्यात येत आहेत, अफवांवर विश्वास ठेऊ नका'

'चुकीच्या बातम्या पसरविण्यात येत आहेत, अफवांवर विश्वास ठेऊ नका'

Next

मुंबई - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकृती उत्तम असून कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे गडकरी यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन सांगण्यात आले आहे. गडकरी यांची प्रकृती उत्तम असून शिमला येथील रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांची नियमित तपासणी केली असल्याचेही या अकाऊंटवरुन सांगण्यात आले आहे. त्यामुळे गडकरी यांच्या प्रकृतीबाबत पसरविण्यात येणाऱ्या खोट्या बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. 

हिमाचल प्रदेशच्या किनौरमधील सांगला येथे प्रचारसभा आटोपल्यानंतर नितिन गडकरी कुफरीला परतत होते. यादरम्यान गडकरींची प्रकृती अचानक बिघडली. गडकरी हे छराबडा येथील एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. शिमल्याहून आयजीएमसीचे डॉक्टरांचे एक पथक तातडीने छराबडा रवाना झाली होती. त्यामुळे गडकरींची प्रकृती बिघडली, अशा बातम्या सोशल मीडियावर पसरल्या. तसेच, अनेक न्यूज पोर्टलवरही आल्या होत्या. मात्र, याबाबत गडकरींच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन माहिती देण्यात आली आहे. तसेच गडकरी यांची प्रकृती उत्तम असल्याचेही सांगण्यात आले. 



लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही नितीन गडकरी यांची प्रकृती बिघडली होती. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार लोखंडे यांच्या प्रचारसभेत बोलताना नितीन गडकरी यांना भोवळ आली. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. तर, याआधीही अहमदनगरमधील राहुरी कृषी विद्यापीठातील पदवीदान सोहळ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली होती. कार्यक्रमात जवळपास अर्धा तास नितीन गडकरी यांनी भाषण केले होते. त्यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत सुरु होण्यापूर्वी नितीन गडकरी यांना भोवळ आली होती. यावेळी रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने त्यांना भोवळ आल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकृती पुन्हा बिघडली. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार लोखंडे यांच्या प्रचारसभेत बोलताना नितीन गडकरी यांना भोवळ आली. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. 
दरम्यान, नितीन गडकरी यांना मधुमेहाचा त्रास असून डॉक्टरांनी त्यांना यापूर्वीही विश्रांतीचा सल्ला दिला आहे. नितीन गडकरी सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. 

Web Title: 'Wrong news is being spread, do not believe in rumors' Nitin gadkari twitter says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.