जागतिक व्यापार संघटनेच्या प्रमुखांनी घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ऑटोग्राफ, VIDEO व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 03:32 PM2023-09-11T15:32:01+5:302023-09-11T15:32:38+5:30
जागतिक व्यापार संघटनेच्या प्रमुखांनी नरेंद्र मोदींवर लिहिलेल्या पुस्तकावर त्यांचा ऑटोग्राफ घेतला.
G20 New Delhi: भारताच्या अध्यक्षतेखाली राजधानी दिल्लीत G20 शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन झाले. या यशस्वी आयोजनामुळे सर्वत्र केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) कौतुक होत आहे. या दरम्यान, जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) महासंचालक नगोजी ओकोन्जो-इवेला(Ngozi Okonjo-Iweala) यादेखील पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना दिसल्या.
#WATCH | G 20 in India | Prime Minister Narendra Modi met WTO Chief Ngozi Okonjo-Iweala during the G20 Summit yesterday. pic.twitter.com/PxF57fDnAS
— ANI (@ANI) September 11, 2023
दिल्लीतील भारत मंडपम येथे G20 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जपान आणि इटलीसह अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख सहभागी झाले होते. G20 चे आयोजन भारतात यशस्वीरित्या झाले आणि संपूर्ण जगानेही त्याचे कौतुक केले. एएनआयने पोस्ट केलेल्या व्हिडिओनुसार, सर्वप्रथम नगोजी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी त्यांच्यावर लिहिलेल्या 'Modi@2.0: Dreams Meet Delivery' या पुस्तकाच्या प्रतीवर PM मोदींचा ऑटोग्राफ घेतला.
अमेरिकेत मोदींचा जलवा
विशेष म्हणजे, यापूर्वी या वर्षी मे महिन्यात झालेल्या G-7 शिखर परिषदेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान मोदींचा ऑटोग्राफ घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. जो बायडेन म्हणाले होते, ‘तुमची अमेरिकेत लोकप्रियता खूप आहे, मला तुमचा ऑटोग्राफ हवा आहे.'
जून महिन्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू पाहायला मिळाली. पंतप्रधान मोदींनी अमेरिकन संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले. पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर अमेरिकन खासदार त्यांच्या ऑटोग्राफसाठी रांगेत उभे राहिले. त्यांच्या भाषणादरम्यान टाळ्यांचा कडकडाट झाला. अमेरिकन सभागृहात पंतप्रधान मोदींना खासदारांकडून 12 वेळा उभे राहून स्वागत करण्यात आले.