CoronaVirus: जगातील पहिल्या रुग्णाचा लागला थांगपत्ता !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 11:02 AM2020-03-29T11:02:42+5:302020-03-29T11:14:45+5:30
अमेरिकेतील वृत्तपत्राच्या दाव्यानुसार चीनच्या वुहान शहरात राहात असलेल्या ५७ वर्षीय वेई गायक्सियन कोरोना व्हायरसच्या ‘पेशंट झिरो’ म्हणून घोषीत कऱण्यात आल्या आहेत. कोरोनाची लागण झाल्यानंतर ही महिला अनेक दिवस रुग्णालयात दाखल होती.
नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. आतापर्यंत हजारो लोकांना या व्हायरसमुळे प्राण गमवावा लागला आहे. आता कोरोना व्हायरस बधित पहिल्या रुग्ण महिलेचा थांबपत्ता लागल्याचा दावा करण्यात आला आहे. ही महिला पूर्णपणे बरी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
जगभरात कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या लोकांना आकडा ३० हजारांच्या घरात पोहोचला आहे. चीनमधील वुहान शहरातून सुरू झालेल्या हा व्हायरस संपूर्ण जगात पोहोचला आहे. युरोप आणि अमेरिकेला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोना व्हायरस बधित पहिली महिला वुहानमध्ये झिंगा मासे विकण्याचे काम करत होती. ही महिला पूर्णपणे बरी झाली आहे.
अमेरिकेतील वृत्तपत्राच्या दाव्यानुसार चीनच्या वुहान शहरात राहात असलेल्या ५७ वर्षीय वेई गायक्सियन कोरोना व्हायरसच्या ‘पेशंट झिरो’ म्हणून घोषीत कऱण्यात आल्या आहेत. कोरोनाची लागण झाल्यानंतर ही महिला अनेक दिवस रुग्णालयात दाखल होती. जानेवारी महिन्यात ही महिला पूर्णपणे ठीक झाली होती. वेई या हुन्नान प्रांतातील मच्छी मार्केटमध्ये झिंगे विकण्याचे काम करत होत्या. गेल्या वर्षी १० डिसेंबर रोजी वेई यांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती.
वेई यांनी कोरोनाच्या संक्रमनाला साधारण आजार समजले होते. सुरुवातीला त्यांना सर्दी आणि ताप आला होता. त्यानंतर त्यांनी स्थानिक रुग्णालयात उपचार घेतले होते. मात्र आराम न मिळाल्यामुळे त्यांनी वुहान येथील रुग्णालयात उपचार घेतले. तिथे त्यांच्या व्यतिरिक्त अनेक कोरोनाग्रस्त असल्याचे समोर आले होते. हे रुग्ण देखील हुन्नान येथील मच्छी मार्केटमध्ये काम करत होते. डिसेंबरच्या अखेरीस डॉक्टरांनी संबंधीत कोरोना व्हायरस रुग्णांना क्वारन्टाईन केले होते.
लेंसेट जनरलचा दावा वेगळाच
कोरोनाच्या झिरो पेशंटवरून याआधी वेगवेगळे दावे करण्यात आले होते. लेंसेट जनरलनुसार कोविड-१९ चा पहिला रुग्ण १ डिसेंबर २०१९ रोजी आढळून आला होता. सिडनी विद्यापीठाचे प्राध्यापक एडवर्ड होम्सनुसार पेशंट झिरोविषय़ी दावा करणे संभ्रमाचे आहे.