गॅझेट्स बॅगेतून न काढता एअरपोर्टवर ‘एक्स रे’ तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 06:03 AM2023-11-28T06:03:08+5:302023-11-28T06:03:32+5:30
Airport Checking: बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर बसविण्यात आलेल्या कॉम्प्युटर टोमोग्राफी एक्स-रे (सीटीएक्स) मशीनमुळे ही गॅझेट्स बॅगेतून बाहेर न काढताही सुरक्षा तपासणी करता येणार आहे.
बंगळुरू - कोणत्याही विमानतळावर सुरक्षा तपासणीवेळी प्रवाशांना त्यांचे मोबाइल, लॅपटॉप वा अन् गॅझेट्स बॅगेतून काढून एका ट्रेमध्ये ठेवावी लागतात, परंतु बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर बसविण्यात आलेल्या कॉम्प्युटर टोमोग्राफी एक्स-रे (सीटीएक्स) मशीनमुळे ही गॅझेट्स बॅगेतून बाहेर न काढताही सुरक्षा तपासणी करता येणार आहे. ही सुविधा उपलब्ध करणारे बंगळुरू हे देशातील पहिले विमानतळ ठरले आहे. याची सुरुवात डिसेंबर महिन्यात केली जाईल.
‘सीटीएक्स’ मशीन ही ऑटोमॅटिक ट्रे रिट्रिव्हल सिस्टिम आणि फुल बॉडी स्कॅनरसह अद्ययावत असल्याने कमीत कमी वेळेत अधिकाधिक प्रवाशांची तपासणी केली जाईल, असे सांगण्यात आले. (वृत्तसंस्था)