Yaas Cyclone: यास चक्रीवादळ; राज्य- केंद्रात समन्वय असावा, मोदींची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 05:58 AM2021-05-24T05:58:15+5:302021-05-24T05:59:01+5:30
Yaas Cyclone Update : यास चक्रीवादळामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या यंत्रणांच्या तयारीचा आढावा रविवारी घेतला.
नवी दिल्ली : यास चक्रीवादळामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या यंत्रणांच्या तयारीचा आढावा रविवारी घेतला.
अतिजोखमीच्या भागांतील लोकांचे स्थलांतर सुरक्षितरित्या व्हावे यासाठी अधिकाऱ्यांनी राज्यांसोबत समन्वयाने काम करावे, वीज पुरवठा खंडित करण्याची वेळ आल्यास तो कालावधी कमी ठेवावा, संपर्काचे जाळे कमी वेळेपुरते बंद ठेवावे आणि ते वेगाने पूर्ववत करावे, असे मोदी यांनी म्हटल्याचे पंतप्रधान कार्यालयाने निवेदनात म्हटले.
अधिकाऱ्यांना निर्देश
किनाऱ्यांवरील लोक आणि उद्योग यासारख्या संबंधित घटकांना या कामात सहभागी करून घ्यावे, असे मोदी अधिकाऱ्यांना म्हणाले. भारतीय हवामान खात्याने यास चक्रीवादळ २६ मेच्या सायंकाळी पश्चिम बंगाल आणि उत्तर ओदिशाचे किनारे ओलांडण्याची अपेक्षा आहे, असे म्हटले.