याहू मेसेंजर बंद होणार !

By admin | Published: June 13, 2016 10:31 PM2016-06-13T22:31:07+5:302016-06-13T22:31:07+5:30

युझर्सनी ०५ ऑगस्ट २०१६ पूर्वी नवीन याहू मेसेंजर वापरायला सुरुवात करावी अन्यथा ०५ ऑगस्ट २०१६ नंतर तुमचे जुने याहू मेसेंजर वापरता येणार नाही.

Yahoo Messenger will close! | याहू मेसेंजर बंद होणार !

याहू मेसेंजर बंद होणार !

Next

अनिल भापकर

याहू मेसेंजर हे सगळ्यात जुन्या मेसेंजर पैकी एक आहे. १९९८ साली याहू पेजर या नावाने सुरु झालेला याहू मेसेंजरचा प्रवास भल्याभल्याना थक्क करणारा असच होता. एके काळी लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ असलेल्या मेसेंजर पैकी एक म्हणजे याहू मेसेंजर.
युझर्सला स्वत:च्या चाट रूम तयार करता येणे तसेच वेगवेगळे इमोशन्स पाठविता येणे यामुळे नेटकरी लोकांमध्ये याहू मेसेंजरने एक वेगळे स्थान निर्माण केले होते.
मात्र जसजसा काळ बदलला तसतसा मेसेंजर मध्ये स्पर्धा निर्माण होत गेली. फेसबुक मेसेंजर ,व्हॉट्सअ‍ॅप,आदी मेसेंजरच्या स्पर्धेत याहू मेसेंजर काहीसे मागे पडल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे याहू मेसेंजर चे अनेक युझर्स इतर मेसेंजरकडे शिफ्ट झाले. याचाच परिणाम म्हणून याहू मेसेंजरने स्वत:मध्ये अनेक बदल घडवत नवीन याहू मेसेंजर डिसेंबर २०१५ साली लॉंच केले. हे नवीन याहू मेसेंजर गुगल प्ले तसेच अ‍ॅप स्टोअर वर उपलब्ध आहे.
आता मात्र याहूने त्यांचे १८ वर्ष जुने याहू मेसेंजर बंद करण्याचा निर्णय घेतला असून त्याजागी नवीन याहू मेसेंजर अधिक फीचर्स सह आणणार आहे. त्यासाठी याहूने युझर्स ला ०५ ऑगस्ट २०१६ पर्यंत नवीन याहू मेसेंजरला अपडेट होण्याचा सल्ला दिला आहे. ०५ ऑगस्ट २०१६ पर्यंतचे मेसेज अर्काइव करता येईल असे समजते . त्यानंतर मात्र जुन्या मेसेजला अक्सेस मिळणार नाही. तेव्हा याहू मेसेंजर वापरणाऱ्या युझर्सनी ०५ ऑगस्ट २०१६ पूर्वी नवीन याहू मेसेंजर वापरायला सुरुवात करावी अन्यथा ०५ ऑगस्ट २०१६ नंतर तुमचे जुने याहू मेसेंजर वापरता येणार नाही.

Web Title: Yahoo Messenger will close!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.