याकूब -२
By admin | Published: August 1, 2015 12:19 AM2015-08-01T00:19:01+5:302015-08-01T00:19:01+5:30
सोळा वजा एक
Next
स ळा वजा एकमध्यवर्ती कारागृहातील फाशी यार्डात याकूबसह एकूण १६ कैदी होते. त्यातील याकूब कमी झाला. तर, उर्वरित १५ जणांना जबर मानसिक धक्का बसला आहे. या १५ ही जणांपैकी बहुतांश जणांच्या खाण्यापिण्यांवर गुरुवारपासून कमालीचा फरक पडल्याचे समजते. याकूबचे झाले आता पुढे कुणाचा नंबर आहे, अशी भीती वजा चर्चा या सर्वांमध्ये पसरली आहे. ---रस्त्यात नारेबाजी पेशीच्या निमित्ताने शुक्रवारी अनेक कैद्यांना पोलिसांनी कोर्टात नेले होते. परत आणताना पोलिसांच्या वाहनातच कैद्यांनी याकूबच्या संबंधाने जोरदार नारेबाजी केली. पोलिसांनी त्यांना कसेबसे गप्प करीत कारागृहात आणून डांबले.---नागपूरला धमकी नाहीनागपूरात कसलीही धमकी नाही, अशी स्पष्टोक्ती शहर पोलीस दलाच्या प्रवक्ता उपायुक्त दीपाली मासिरकर यांनी दिली आहे. याकूबला फाशी देण्यात आल्यानंतर छोटा शकीलने धमकी दिल्यामुळे नागपूरात उलटसुलट चर्चा सुरू होती. मात्र, नागपूरला कसल्याही प्रकारची कुणीही धमकी दिली नसल्याचे मासिरकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.----