याकूबने गुन्हा केला पण फाशी नको -ओवैसी
By admin | Published: July 30, 2015 01:34 AM2015-07-30T01:34:04+5:302015-07-30T01:34:04+5:30
फाशीच्या शिक्षेला आव्हान देणारी याकूबची सुधार याचिका फेटाळून लावण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी बुधवारी दिली.
नवी दिल्ली : फाशीच्या शिक्षेला आव्हान देणारी याकूबची सुधार याचिका फेटाळून लावण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी बुधवारी दिली. याकूबच्या पाठीशी कुठलीही राजकीय शक्ती नाही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन काँग्रेस सरकारने याकूबला धोका दिला. त्यामुळेच याकूबला फासावर लटकवले जात आहे, असा आरोप ओवैसी यांनी केला. पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंतसिंग, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना फाशी नाही तर याकूबलाच का? याकूब बॉम्बस्फोटात सामील होता, पण त्याला फाशी व्हायला नको. याकूबच्या फाशीच्या मुद्द्यावर महाराष्ट्र पोलिसांनी राज्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. पण हे आवाहन केवळ मुस्लीम नेत्यांना केले गेले. केवळ त्यांना सहकार्य करण्यासाठी सांगितले गेले, हेही धक्कादायक असल्याचे ते म्हणाले.