याकूब बातमी - जोड
By admin | Published: July 20, 2015 11:59 PM2015-07-20T23:59:22+5:302015-07-20T23:59:22+5:30
याकूबच्या फाशीवर आज निर्णय?
Next
य कूबच्या फाशीवर आज निर्णय? नागपूर : मुंबईतील बॉम्बस्फोट मालिकेचा सूत्रधार याकूब मेमनने फाशीच्या शिक्षेविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे. यानंतर निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. याकूबने त्याच्या स्थानिक वकिलांसोबत मध्यवर्ती कारागृहात सोमवारी दुपारी तब्बल ४० मिनिटे यासंदर्भात चर्चा केली. क्युरेटिव्ह याचिकेच्या निकालानंतरच फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीची पुढील प्रक्रिया गतिमान होणार आहे. न्यायालयासमक्ष काय भूमिका मांडायची, यावर याकूबने ॲड. अनिल गेडाम यांच्याशी चर्चा केली. याकूबचा चुलतभाऊ उस्मान मेमन हा देखील यावेळी हजर होता. प्रस्तुत प्रतिनिधीने ॲड. गेडाम यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, त्यांनी विस्तृत बोलण्याचे टाळले.