दिल्लीत यमुनेने ओलांडली धोक्याची पातळी
By Admin | Published: August 14, 2016 09:39 AM2016-08-14T09:39:09+5:302016-08-14T09:39:09+5:30
संततधार पावसामुळे शनिवारी रात्री यमुना नदीने २0४ मिटर ही धोक्याची पातळी ओलांडली. वाढत्या जलस्तरामुळे दिल्लीला पूराचा धोका निर्माण झाला आहे.
नवी दिल्लीत - सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शनिवारी रात्री यमुना नदीने २0४ मिटर ही धोक्याची पातळी ओलांडली. वाढत्या जलस्तरामुळे दिल्लीला पूराचा धोका निर्माण झाला असून, पूरपरिस्थितीमुळे जुन्या लोखंडी पुलावरून जाणाऱ्या ३२ पेक्षाही अधिक गाड्यांना रेल्वे प्रशासनाने ‘ब्रेक’ लावावे आहेत. शनिवारी सायंकाळपासूनच ‘यमुने’चा जलस्तर वाढत गेला. पूराचा धोका असलेल्या सखल भागा तील नागरिकांना इतरत्र हलविण्याचे काम उशिरा रात्री सुरू झाले. बचाव कार्यासाठी आपत्कालीन विभाग कामाला लागला आहे.