बाल मंदिर शाळेचे विज्ञान प्रदर्शनात यश
By admin | Published: December 9, 2015 11:56 PM2015-12-09T23:56:47+5:302015-12-09T23:57:22+5:30
नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संचलित, बाल शिक्षण मंदिर, गोरेराम लेन शाळेने विज्ञान प्रदर्शनात यश मिळविले. रमाबाई आंबेडकर विद्यालयात केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यात शाळेतील विद्यार्थ्यांनी ऊर्जा बचत व सौर ऊर्जेची उपकरणे मांडली होती. यात केंद्रस्तरावर ऊर्जा बचत उपकरणास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापक आशा उमाप, शिक्षिका रंजना देवरे, शीतल शिंदे व शिक्षक संदीप शिंदे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांमध्ये तुषार लहामगे, तनय डामरे, अनुराधा धस, हर्षाली सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला.

मालतीबाई कुलकर्णी विद्यालयात रंगली पाककला स्पर्धा
नाशिक : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या मालतीबाई कुलकर्णी विद्यालयात माता-पालक पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांबरोबर माता-पालकदेखील सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेस सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला.
शाळेचे मुख्याध्यापक एस. एस. जगदाळे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण माता-पालक संघाच्या सदस्या सलोना बनसोडे व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य वंदना कडलग यांनी केले.
या स्पर्धेत अलका चासकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच आशा भोंडे यांनी द्वितीय, तर कमल खैरनार यांनी तृतीय क्रमांक मिळविला. यावेळी पालक-शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
माई लेले विद्यालयात विविध स्पर्धा
नाशिक : श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालय या गंगापूररोडच्या श्रवण सुधार शाळेत ग्रोफर्स कंपनीच्या वतीने शाळेच्या मुलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. ग्रोफर्स कंपनीचे मॅनेजर राहुल सोनवणे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी १५० विद्यार्थ्यांना केक व दुधाचे वाटप करण्यात आले. यावेळी कंपनीचे मॅनेजर राहुल सोनवणे, अभिजीत तोडकर, निरज प्रसाद, विनोद निकम, वृषाली घारपुरे, रश्मी दांडेकर, अरुणा फुलार्मीकर, लक्ष्मण महाले, संगीता जाधव, संतोष पाटील आदि उपस्थित होते.