युवाशक्ती देणार शिरसोलीला ३० हजार लीटर पाणी

By admin | Published: March 22, 2016 12:41 AM2016-03-22T00:41:57+5:302016-03-22T00:41:57+5:30

जळगाव- यंदाची दुष्काळी स्थिती लक्षात घेता युवाशक्ती फाउंडेशनने पाणी बचतीचा संकल्प करीत पाणीटंचाई निवारणार्थ मदत करण्याचा निर्णय घेतला असून, त्याअंतर्गत २२ रोजी सकाळी १०.३० वाजता शिरसोली येथे ३० हजार लीटर पाण्याचे वितरण केले जाणार आहे. शिरसोली येथे २५ दिवसात एकदा पाणी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर तेथे पाणी दिले जाणार आहे. तसेच यंदा काव्यरत्नावली चौकात धुलिवंदन साजरे न करता लाखो लीटर पाणी वाचविण्याचा निर्णयही फाउंडेशनने घेतला आहे. शिरसोली येथील समस्येसंबंधी फाउंडेशनचे संस्थापक विराज कावडिया, अमित जगताप, मंजित जांगीड, भूषण सोनवणे, विनोद बाविस्कर, संदीप सूर्यवंशी, श्वेता चौधरी आदींनी शिरसोली येथे सरपंच अर्जुन काटोले यांची भेट घेतली. नगरसेवकांनी युवाशक्ती फाउंडेशनला आपले टँकर उपलब्ध करून द्यावे, चालक व डिझेलचा खर्च फाउं

Yashashakti will give 30 thousand liters of water to Shirsoli | युवाशक्ती देणार शिरसोलीला ३० हजार लीटर पाणी

युवाशक्ती देणार शिरसोलीला ३० हजार लीटर पाणी

Next
गाव- यंदाची दुष्काळी स्थिती लक्षात घेता युवाशक्ती फाउंडेशनने पाणी बचतीचा संकल्प करीत पाणीटंचाई निवारणार्थ मदत करण्याचा निर्णय घेतला असून, त्याअंतर्गत २२ रोजी सकाळी १०.३० वाजता शिरसोली येथे ३० हजार लीटर पाण्याचे वितरण केले जाणार आहे. शिरसोली येथे २५ दिवसात एकदा पाणी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर तेथे पाणी दिले जाणार आहे. तसेच यंदा काव्यरत्नावली चौकात धुलिवंदन साजरे न करता लाखो लीटर पाणी वाचविण्याचा निर्णयही फाउंडेशनने घेतला आहे. शिरसोली येथील समस्येसंबंधी फाउंडेशनचे संस्थापक विराज कावडिया, अमित जगताप, मंजित जांगीड, भूषण सोनवणे, विनोद बाविस्कर, संदीप सूर्यवंशी, श्वेता चौधरी आदींनी शिरसोली येथे सरपंच अर्जुन काटोले यांची भेट घेतली. नगरसेवकांनी युवाशक्ती फाउंडेशनला आपले टँकर उपलब्ध करून द्यावे, चालक व डिझेलचा खर्च फाउंडेशन करील, असे आवाहन फाउंडेशनने केले आहे.

Web Title: Yashashakti will give 30 thousand liters of water to Shirsoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.