यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा, निकालानंतर निदर्शकांकडून दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 07:21 AM2022-05-26T07:21:24+5:302022-05-26T07:22:00+5:30

फुटीरवादी नेते यासिन मलिक यांना सुनावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा दुर्दैवी आहे. यामुळे शांततेच्या प्रयत्नांना झटका बसला आहे, असे गुपकर आघाडीने म्हटले आहे

Yasin Malik sentenced to life imprisonment, stoned by protesters | यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा, निकालानंतर निदर्शकांकडून दगडफेक

यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा, निकालानंतर निदर्शकांकडून दगडफेक

googlenewsNext

नवी दिल्ली : काश्मिरी फुटीरवादी नेता यासिन मलिक याला दिल्लीतील न्यायालयाने दहशतवादाला आर्थिक रसद प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश प्रवीण सिंह यांनी बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा, भादंविअन्वये विविध गुन्ह्यांसाठी वेगवेगळ्या अवधीची शिक्षा सुनावली. कोर्टाने मलिक याला १० लाख रुपयांचा दंडही सुनावला आहे.

मलिकला दोन गुन्ह्यांसाठी भादंवि कलम १२१ (भारत सरकारविरुद्ध युद्ध छेडणे) आणि बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यातील कलम १७ अन्वये जन्मठेप सुनावली. सर्व शिक्षा एकाच वेळी भोगायच्या आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) यासिन मलिक यांना मृत्युदंड देण्याची विनंती केली होती.
कोर्टाने जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख यासिन मलिक याला १९ मे रोजी दोषी ठरविले होते. मलिक याने सर्व आरोप मान्य केले होते. कोर्टाने मलिक याला दंड ठोठावण्यासाठी एनआयएच्या अधिकाऱ्यांना त्याच्या आर्थिक स्थितीचे आकलन करण्याचे निर्देश दिले होते. दहशतवादासाठी आर्थिक रसद पुरविल्याप्रकरणी २०१७ मध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात त्याला २०१९ च्या सुरुवातीला अटक करण्यात आली होती.

हे होते आरोप
यासिन मलिक याच्यावर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यातील (यूएपीए) कलम १६ (दहशतवादी कृत्य), कलम १७ (दहशतवादी 
कारवायांसाठी निधी उभारणे) कलम १८ (दहशतवादी कृत्याचा कट) कलम २० (दहशतवादी टोळी किंवा संघटनेचा सदस्या, तसेच भादंवि 
कलम १२०-बी (गुन्हेगारी कटकारस्थान) आणि १२४-ए (राजद्रोह) अन्वये आरोप ठेवण्यात आले होते.

निदर्शकांकडून दगडफेक 
n यासिन मलिक याच्या शिक्षेबाबत कोर्टाचा निर्णय घोषित होण्याआधी बुधवारी श्रीनगरमधील काही भाग बंद होते. शहरातील मैसुमा परिसरात जेकेएलएफ प्रमुख यासिन मलिक याचे समर्थक आणि सुरक्षा दलांदरम्यान संघर्ष झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 
n लाल चौकापासून काही अंतरावर असलेल्या मैसुमा परिसरातील मलिक याच्या घराबाहेर महिलांसह मोठ्या संख्येने लोक जमले. त्यांनी मलिक याच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या आणि मोर्चाही काढला. 
n निर्दशकांना पांगविण्यासाठी अश्रुधुराचा मारा करणाऱ्या सुरक्षा दलांवर काही निदर्शकांनी दगडफेक केली. तथापि, कोणीही जखमी झाले नाही. 
n मैसुमा आणि लाल चौकासह आसपासच्या भागातील बहुतांश दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होती. 
n जुन्या शहरातील काही भागांतही दुकाने बंद होती. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात सुरक्षा दले तैनात करण्यात आली आहेत.

शांततेच्या प्रयत्नांना झटका : गुपकर आघाडी
फुटीरवादी नेते यासिन मलिक यांना सुनावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा दुर्दैवी आहे. यामुळे शांततेच्या प्रयत्नांना झटका बसला आहे, असे गुपकर आघाडीने म्हटले आहे. द पीपल्स अलायन्स फॉर गुपकर डिक्लरेशन (पीएजीडी) प्रवक्ते एम. वाय. तरिगामी यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, यामुळे जम्मू-काश्मीरमधील अनिश्चिता आणखी वाढेल आणि परकेपणा आणि फुटीरवादी भावनांना उत्तेजन मिळेल. एनआयए कोर्टाने निर्णय दिला; परंतु, न्याय दिला नाही.

 

Web Title: Yasin Malik sentenced to life imprisonment, stoned by protesters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.