Yasin Malik: यासिन मलिक दोषी, दहशतवादी कारवायांची कबुली; 25 मे रोजी शिक्षेवर सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 01:09 PM2022-05-19T13:09:21+5:302022-05-19T13:17:31+5:30

Yasin Malik: एनआयएच्या विशेष न्यायालयाने यासिल मलिकला दोषी ठरवले आहे.

Yasin Malik: Yasin Malik convicted, confessed to terrorist acts; Sentencing hearing on May 25 | Yasin Malik: यासिन मलिक दोषी, दहशतवादी कारवायांची कबुली; 25 मे रोजी शिक्षेवर सुनावणी

Yasin Malik: यासिन मलिक दोषी, दहशतवादी कारवायांची कबुली; 25 मे रोजी शिक्षेवर सुनावणी

Next

Yasin Malik Convicted: जम्मू-काश्मीरातील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला टेरर फंडिंग प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. आता 25 मे रोजी यासिन मलिकच्या शिक्षेवर चर्चा होईल. दरम्यान, मलिकवरील आरोपांचा तीव्र निषेध करत पाकिस्तानने भारतीय दूतावासाच्या प्रभारींना निवेदन सोपवले आहे.

पाकिस्तानचे निवेदन
काश्मिरी नेतृत्वाचा आवाज दाबण्यासाठी भारत सरकारने यासिल मलिकला खोट्या प्रकरणात अडकवल्याबद्दल पाकिस्तानने भारतीय दूतावासाकडे गंभीर चिंता व्यक्त केल्याचे निवेदनात म्हटले आहे. 2019 पासून अमानवीय परिस्थितीत तिहार तुरुंगात मलिकच्या नजरकैदेबद्दलही पाकिस्तानने दिलेल्या निवेदनात भाष्य केले आहे.

मलिकने स्विकारले गुन्हे
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, पाकिस्तानने भारत सरकारला मलिकची सर्व आरोपातून मुक्तता करण्याची आणि तुरुंगातून तात्काळ सुटका करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मलिकने काश्मीर खोऱ्यात अशांतता निर्माण करणाऱ्या कथित दहशतवाद आणि फुटीरतावादी कारवायांची कबुली दिली आहे. मलिकवर बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा (UAPA) आणि विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहेत.

मलिकवर भारतीय दंड संहितेच्या कलम 16 (दहशतवाद कायदा), कलम 17 (दहशतवादासाठी निधी), कलम 18 (दहशतवादाचा कट रचणे) आणि कलम 20 (दहशतवादी टोळीचा सदस्य) असे आरोप ठेवण्यात आले आहेत. यासोबतच त्याच्यावर UAPA, 120B (गुन्हेगारी कट) आणि 124A (देशद्रोह) देखील लावण्यात आले आहेत.

मलिकला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते

यासीनवर ज्या कलमांमध्ये गुन्हा दाखल आहे, अशा प्रकरणात त्याला जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. यासीन मलिक काश्मीरच्या राजकारणात सक्रिय होता. तरुणांना भडकावण्यात आणि दहशतवादी कारवायांमध्ये सामील करण्यात त्याचा महत्त्वाचा हात मानला जातो. मलिक जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) शी संबंधित आहे. 2019 मध्ये केंद्र सरकारने JKLF वर बंदी घातली होती. यासीन मलिकवर 1990 मध्ये हवाई दलाच्या 4 जवानांची हत्या केल्याचा आरोप आहे, ज्याची त्याने कबुली दिली आहे. मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबिया सईद हिचे अपहरण केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे.

 

Web Title: Yasin Malik: Yasin Malik convicted, confessed to terrorist acts; Sentencing hearing on May 25

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.