Yasin Malik: 'होय, मी दहशतवादी कारवायांमध्ये सामील होतो', यासीन मलिकने कोर्टासमोर मान्य केले सर्व गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 10:37 AM2022-05-11T10:37:02+5:302022-05-11T10:37:22+5:30
Yasin Malik: जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेता मोहम्मद यासीन मलिक याने दिल्ली एनआयए कोर्टात दहशतवादाशी संबंधित सर्व गुन्ह्यांची कबुली दिली आहे. 19 मे रोजी त्याच्या शिक्षेवर सुनावणी होईल.
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेता मोहम्मद यासीन मलिक (Yasin Malik) याने दिल्ली एनआयए कोर्टात दहशतवादाशी संबंधित सर्व गुन्ह्यांची कबुली दिली आहे. मलिक याच्यावर दिल्ली उच्च न्यायालयात बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा (UAPA) यासह दहशतवादाशी संबंधित अनेक खटले दाखल आहेत. विशेष न्यायाधीश प्रवीण सिंह या प्रकरणावर 19 मे रोजी सुनावणी करणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मलिक त्याच्यावरील आरोपांना आव्हान देणार नाही. मलिकवर भारतीय दंड संहितेच्या कलम 16 (दहशतवाद कायदा), कलम 17 (दहशतवादासाठी निधी), कलम 18 (दहशतवादाचा कट रचणे) आणि कलम 20 (दहशतवादी टोळीचा सदस्य) असे आरोप ठेवण्यात आले आहेत. यासोबतच त्याच्यावर UAPA, 120B (गुन्हेगारी कट) आणि 124A (देशद्रोह) देखील लावण्यात आले आहेत.
19 मे रोजी शिक्षेवर निकाल
विशेष न्यायाधीश प्रवीण सिंह 19 मे रोजी यासिन मलिकच्या गुन्ह्याची शिक्षा सुनावणार आहेत. या प्रकरणांमध्ये मलिकला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. दरम्यान, विशेष न्यायालयाने काश्मिरी फुटीरतावादी फारुख अहमद दार उर्फ बिट्टा कराटे, शाबीर शाह, मसरत आलम, मोहम्मद युसूफ शाह, आफताब अहमद शाह, अल्ताफ अहमद शाह, नईम खान, मोहम्मद अकबर खांडे, राजा मेहराजुद्दीन कलवाल, बशीर अहमद बट्ट, जहूर अहमद यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. वताली, शाबीर अहमद शाह, अब्दुल रशीद शेख आणि नवलकिशोर कपूर यांच्याविरुद्ध आरोपपत्रे आहेत. लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी म्होरक्या हाफिज सईद आणि हिजबुल मुजाहिद्दीनचा सय्यद सलाहुद्दीन यांच्यावरही आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.