येवल्यात मुद्रा योजना मार्गदर्शन शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 12:38 AM2018-03-12T00:38:26+5:302018-03-12T00:38:26+5:30
येवला : कलाकृती वुमन्स फाउंडेशन व भारतीय जनता पार्टी विणकर आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुद्रा योजना मार्गदर्शन व नेत्र चिकित्सा शिबीर येथील डॉ.हेडगेवार सभागृहात संपन्न झाले.
येवला : कलाकृती वुमन्स फाउंडेशन व भारतीय जनता पार्टी विणकर आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुद्रा योजना मार्गदर्शन व नेत्र चिकित्सा शिबीर येथील डॉ.हेडगेवार सभागृहात संपन्न झाले.
कार्यक्रमास प्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे प्रदेश उद्योग आघाडीचे अध्यक्ष प्रदीप पेशकार, मुद्रा बँंक योजनेच्या महाराष्ट्र प्रदेश समिती सदस्य मंदा फड, भाजपाचे विणकर आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनोज दिवटे, नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर, नगरसेवक प्रमोद सस्कर,नगरसेविका शितल शिंदे, सरोजिनी वखारे, डॉ शंकर कोटमे, डॉ श्रध्दा गडे, नाशिकचे युवा नेते गणेश सातभाई उपस्थित होते.प्रास्ताविक कलाकृतीच्या अध्यक्षा गौरी दिवटे यांनी केले. यावेळी बोलतांना मंदा फड यांनी ज्ञान मिळवा कौशल्य जोपासा आणि निश्चित ध्येयापर्यंत पोहोचा, असा सल्ला दिला. जीवनात आपण अशक्य गोष्ट सहज शक्य करू शकता असे प्रतिपादन केले. नेत्र तपासणी शिबीरात अनेक महीलांनी सहभाग घेतला. डॉ शंकर कोटमे व डॉ श्रध्दा गडे यांनी सहकार्य केले. सुत्रसंचलन चंचल वायडे, संध्या कोकणे, सारीका दिवटे यांनी केले, आभार प्रदर्शन मनोज दिवटे यांनी केल. कार्यक्र म यशस्वीते करीता राजेंद्र नागपुरे, पंकज कट्यारे, राधिका पहीलवान, दर्शना निकम, स्वाती गाडेकर, राहुल भांडगे, मारूती पवार, अनुपमा मढे आदिनी परिश्रम घेतले.कार्यक्र माला महीला बचत गट, युवक, युवतींसह नवउद्योजक उपस्थित होते.