या वर्षीही सात कोटींच्या विदेश सहली!

By admin | Published: August 11, 2015 12:03 AM2015-08-11T00:03:36+5:302015-08-11T00:03:36+5:30

सात देशांत सहल : कोणत्या कंपन्यांना कंत्राट मिळणार, याची यादी ‘लोकमत’कडे!

This year also a foreign trip abroad! | या वर्षीही सात कोटींच्या विदेश सहली!

या वर्षीही सात कोटींच्या विदेश सहली!

Next
त देशांत सहल : कोणत्या कंपन्यांना कंत्राट मिळणार, याची यादी ‘लोकमत’कडे!
राजू नायक/पणजी :
विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गोवा पर्यटन खाते मंत्री-आमदारांचे विदेश दौरे आणि ‘जंकेट टूर्स’ आयोजित करते. यावर प्रखर टीका होऊनही सरकारने या वर्षीही विविध मौजेच्या सहलींवर सात कोटींवर रुपये उधळण्याचे निश्चित केल्याची अंतर्गत गोटातील माहिती ‘लोकमत’ला उपलब्ध झाली आहे.
जगातील सात प्रमुख देशांत या मौजेच्या सहली होणार आहेत. त्यांची कंत्राटे सात प्रवासी पर्यटन क्षेत्रातील कंपन्यांना वाटून दिली आहेत. या कंपन्यांनी आपसात स्पर्धा करण्याऐवजी आपापसात मिळून आणि राजकीय उच्चपदस्थांना खुश करून राजीखुशी नफा कमवावा, अशी ती कल्पना आहे. या मौजेच्या सहली मॉस्को, पॅरिस, सिंगापूर, लंडन, स्पेन, बर्लिन व इस्राईल या देशांमध्ये होणार आहेत.
ज्या कंपन्यांना हे कंत्राट मिळणार आहेत, त्यांच्यासह हे कंत्राट ज्या रकमांना मिळाले आहेत, त्यांची यादीच ‘लोकमत’ला उपलब्ध झालेली आहे. ही यादी अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेली नाही, हे विशेष.
मॉस्को येथील सहलीसाठी 99 लाख 37 हजार 494 कंत्राट देण्यात येणार आहे. हे कंत्राट मुंबईस्थित ‘गोल्डमाईन’ कंपनीला मिळणार आहे. या यादीत ‘शॉन’ व विन्सन अशा दोन गोमंतकीय कंपन्या आहेत. त्यांना इस्राईल तसेच पॅरिस व सिंगापूरची कंत्राटे मिळणार आहेत. ‘विन्सन’ कंपनीला पॅरिसचे कंत्राट 88 लाख 38 हजार 420 रुपयांना, तर सिंगापूरचे कंत्राट 1 कोटी 27 लाख 26 हजार 960 रुपयांना देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.
अँलिका पर्पल, एएमओ, क्रेयोंग, गोल्ड माईन, शॉन व विन्सन अशा सहा कंपन्यांना ही कंत्राटे वाटून देण्यात आली असून ‘मिळून सारेजण’ या सहकार्याच्या धोरणामुळे गोव्याचे पर्यटन खाते आवडीचे खाते बनले आहे.

Web Title: This year also a foreign trip abroad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.