यंदा गोव्यात डेफएक्स्पो-इंडिया
By admin | Published: March 15, 2016 02:23 AM2016-03-15T02:23:34+5:302016-03-15T02:23:34+5:30
गोव्यात होणाऱ्या ‘डेफएक्स्पो-इंडिया-२०१६’ प्रदर्शनात ४६ देशांतील ९७७ कंपन्या सहभागी होत असून दिल्लीबाहेर पहिल्यांदाच गोव्यात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
पणजी : गोव्यात होणाऱ्या ‘डेफएक्स्पो-इंडिया-२०१६’ प्रदर्शनात ४६ देशांतील ९७७ कंपन्या सहभागी होत असून दिल्लीबाहेर पहिल्यांदाच गोव्यात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. २८ ते ३१ मार्चदरम्यान दक्षिण गोव्यातील क्वेपेम तालुक्यातील नॅक्वेरी क्विटॉल येथे आयोजित करण्यात आलेले हे नववे प्रदर्शन होय.
नौदल, पायदळ आणि अंतर्गत सुरक्षा प्रणालीच्या या प्रदर्शनात ४६ देशांमधील संरक्षण क्षेत्रातील ९७७ कंपन्या सहभागी होणार असून यासाठी या सर्व कंपन्यांनी नोंदणीही केली आहे. भारतातील या नवव्या प्रदर्शनात अमेरिका, रशिया, स्वीडन, कोरिया प्रजासत्ताक, स्वीत्झर्लंड, संयुक्त अरब अमिरात आणि पोर्तुगालसह ४६ देश सहभागी होत आहेत. आठवे प्रदर्शन फेब्रुवारी २०१४ मध्ये आयोजित करण्यात आले होते. यातही देश-विदेशातील संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांनी लक्षणीय सहभाग नोंदविला होता.
संरक्षण मंत्रालयाने या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनावर एक वेबसाईट तयार केली आहे. ‘डेफएक्स्पो-इंडिया-२०१६’ हे प्रदर्शन विकासाचे सुकाणू असून प्रत्येक प्रदर्शनाला आंतरराष्ट्रीय स्तरांवरून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आला आहे, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.
प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी विविध विषयांवर परिसंवाद होतील. २९ मार्च रोजी असोचेमच्या वतीने जागतिक गुंतवणूकदार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.