काश्मीर खोºयात यावर्षी दगडफेक ९० टक्के घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 10:48 PM2017-11-13T22:48:52+5:302017-11-13T22:49:11+5:30

काश्मीर खोºयात यावर्षी दगडफेकीच्या घटनांत गेल्या वर्षीच्या तुलनेत ९० टक्के घट झाल्याची माहिती जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी दिली.

This year, the loss of Kashmir has decreased by 90 percent | काश्मीर खोºयात यावर्षी दगडफेक ९० टक्के घटली

काश्मीर खोºयात यावर्षी दगडफेक ९० टक्के घटली

googlenewsNext

जम्मू : काश्मीर खोºयात यावर्षी दगडफेकीच्या घटनांत गेल्या वर्षीच्या तुलनेत ९० टक्के घट झाल्याची माहिती जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी दिली. ते येथे सोमवारी वृत्तसंस्थेशी बोलत होते. परिस्थितीत झालेल्या या सुधारणेचे श्रेय त्यांनी काश्मीरमधील जनतेला दिले. राष्ट्रीय तपासणी यंत्रणेने (एनआयए) घातलेल्या छाप्यांनाच केवळ या सुधारलेल्या परिस्थितीचे श्रेय देता येणार नाही, तर नोटाबंदी आणि वरिष्ठ अतिरेकी कमांडर्सवर केलेली कारवाई, अशी अनेक कारणेही त्यामागे आहेत, असे ते म्हणाले. गेल्या वर्षी दिवसभरात दगडफेकीचे ४०-५० प्रकार सहज घडायचे, असे सांगून ते म्हणाले, दिवसभरात दगडफेकीचा एकही प्रकार घडला नाही असे किती तरी आठवडे आहेत. गेल्या वर्षी मात्र दिवसभरात ४०-५० प्रकार घडायचे. लोकांच्या विचारात खूप मोठा बदल घडला आहे. काश्मीर खोºयातील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थितीत खूप मोठा बदल घडला आहे व तो विशेषत: राज्यात राहणाºयांना जाणवेल, असे ते म्हणाले. गेल्या वर्षी शुक्रवारी दगडफेकीचे ४०-५० प्रकार घडायचे व यावर्षी एकही घडला नाही. खोºयात झालेला हाच मोठा बदल आहे. एखाद्या उपायाने हा बदल घडलेला नाही, तर सगळ्या उपायांचा तो एकत्रित परिणाम आहे. राजकीय अंगाने होणारा पुढाकारही यात महत्त्वाचा आहे. शिवाय अतिरेक्यांवर अत्यंत कठोरपणे केलेल्या कारवाईचाही चांगला परिणाम झाल्याचे वैद्य म्हणाले.
 

Web Title: This year, the loss of Kashmir has decreased by 90 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.