यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार
By admin | Published: June 2, 2016 04:38 PM2016-06-02T16:38:00+5:302016-06-02T18:59:36+5:30
बळीराजापासून सामान्यजन प्रतीक्षेत असलेल्या पावसाचं यंदा जोरदार आगमन होण्याची शक्यता आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2- बळीराजापासून सामान्यजन प्रतीक्षेत असलेल्या पावसाचं यंदा जोरदार आगमन होण्याची शक्यता आहे. केरळ आणि अंदमान-निकोबारला झोडपणारा पाऊस लवकरच महाराष्ट्रातही दाखल होणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून ओढ देणारा पाऊस यंदा चांगला बरसण्याचा अंदाज आहे. यंदा सरासरीपेक्षा 104 ते 110 टक्के जास्त पाऊस पडणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं पत्रकार परिषद घेऊन दिली. मध्य भारतात 113 टक्के पाऊस कोसळणार असून, उत्तर-पूर्व भारतात 94 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
जुलै आणि ऑगस्टमध्ये यंदा दमदार पाऊस पडणार असून, मराठवाड्यासह विदर्भालाही दिलासा देण्याची शक्यता आहे. भारतात जुलै महिन्यात सरासरीच्या 107 टक्के पाऊस, तर ऑगस्टमध्ये 104 पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. त्यामुळे दुष्काळात होरपळणारे लोक पावसामुळे सुखावणार आहे.