यंदाच्या मान्सूनने देशातून घेतला निरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 05:16 AM2021-10-26T05:16:51+5:302021-10-26T05:17:08+5:30
monsoon : मान्सून देशातून परतला असतानाच सर्वत्र पावसाची हजेरी कमी झाली आहे. देशभरात पावसात घट झाली आहे. गेल्या दहा वर्षांतील मान्सूनच्या माघारीच्या तारखा पाहिल्या असता मागील पाच वर्षांत मान्सून २५ ऑक्टोबरच्या आसपास देशातून परतला आहे.
मुंबई : तब्बल चार महिन्यांहून अधिक काळ मुंबईसह राज्य आणि देशभरात अधिक बरसलेला मान्सून सोमवारी देशातून माघारी परतल्याची घोषणा भारतीय हवामानशास्त्र विभागाने केली आहे. या चार महिन्यांच्या काळात मान्सूनने राज्यात दमदार कामगिरी केली असून, राज्यात सर्वत्र अधिकचा पाऊस नोंदविण्यात आला आहे.
मान्सून देशातून परतला असतानाच सर्वत्र पावसाची हजेरी कमी झाली आहे. देशभरात पावसात घट झाली आहे. गेल्या दहा वर्षांतील मान्सूनच्या माघारीच्या तारखा पाहिल्या असता मागील पाच वर्षांत मान्सून २५ ऑक्टोबरच्या आसपास देशातून परतला आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात २४ तासांत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे आणि हे कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली.