ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये 'आधार' बनला या वर्षातील नवीन शब्द
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2018 09:21 PM2018-01-27T21:21:31+5:302018-01-27T21:34:21+5:30
ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये या वर्षी नव्या शब्दाच्या रूपात 'आधार' ला जागा मिळाली आहे.
जयपूर- ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये या वर्षी नव्या शब्दाच्या रूपात 'आधार' ला जागा मिळाली आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने शनिवारी जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलदरम्यान या बद्दलची घोषणा केली. आधार या शब्दाने मित्रों, जुमाला, गोरक्षक, विकास, नोटबंदी आणि भक्त या शब्दांना मागे टाकत ऑक्सफोर्ड डिक्शनरीमध्ये जागा बनविली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहिलं आधारकार्ड 2010मध्ये बनलं. त्याची संकल्पना 2009मध्ये बनली होती. 2017मध्ये सरकारी धोरणांमुळे हा शब्द वर्षभर चर्चेत पाहिला. 2018मध्येही या शब्द चर्चेत राहण्याची शक्यता आहे. इंग्रजीप्रमाणे पहिल्यांदा हिंदीत वर्ड ऑफ इयर घोषित करण्यात आलं आहे. या घोषणेच्या वेळी व्यासापीठावर लेखक अशोक वायपेयी, पत्रकार विनोद दुआ, चित्रा मुद्रल, अनु सिंह चौधरी, पंकज दुबे, सौरभ द्विवेदी उपस्थित होते.
ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, निवड समितीसमोर आलेल्या हिंदी शब्दांपैकी एका शब्दाला निवडण आव्हान होतं. अंतिम निवड झालेल्या शब्दांमध्ये आधारबरोबर नोटबंदी, स्वच्छ, योग, विकास आणि बाहुबलीसारखे शब्दही होते. त्यांनी म्हंटलं, वर्षाचा हिंदी शब्द, एक अशी अभिव्यक्ती आहे ज्याने सगळ्यांत जास्त लक्ष केंद्रित केलं असेल. गेल्या वर्षातील घडामोडी, भाव या सगळ्याचं चित्रण त्या शब्दात असेल.