Karnataka Assembly Elections 2018:उत्तर प्रदेशप्रमाणे कर्नाटकातील अंदाजही चुकतील, आम्हीच विजयी होणार- येडीयुरप्पा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2018 12:07 PM2018-05-07T12:07:37+5:302018-05-07T12:09:32+5:30
बेंगळुरु रिपोर्टर्स गिल्ड आणि प्रेस क्लब ऑफ बेंगळुरू तर्फे आयोजित केलेल्या पत्रकारसभेमध्ये येडीयुरप्पा यांनी भाजपाच्या मिशन 150ची माहिती सांगितली. भारतीय जनता पार्टीने 150 जागांचे लक्ष्य ठेवले असून ते प्राप्त करण्यात आम्ही यशस्वी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बेंगळुरु- कर्नाटकात आगामी विधानसभा त्रिशंकू असेल असे भाकीत ओपिनियन पोलनी व्यक्त केले आहे. मात्र उत्तर प्रदेशप्रमाणे येथील अंदाजही चुकतील असे मत कर्नाटकचे माजी मुख्यंमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांनी व्यक्त केले आहे. 15 मे रोजी भारतीय जनता पार्टी पूर्ण क्षमतेने विजयी झालेला असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बेंगळुरु रिपोर्टर्स गिल्ड आणि प्रेस क्लब ऑफ बेंगळुरू तर्फे आयोजित केलेल्या पत्रकारसभेमध्ये येडीयुरप्पा यांनी भाजपाच्या मिशन 150ची माहिती सांगितली. भारतीय जनता पार्टीने 150 जागांचे लक्ष्य ठेवले असून ते प्राप्त करण्यात आम्ही यशस्वी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उमेदवार निवडीवर येडीयुरप्पा नाराज आहेत अशा बातम्या त्यांनी नाकारल्या. ''गेल्या दोन वर्षांमध्ये आपण राज्याचा तीनवेळा दौरा केला. त्या सर्वेक्षणावर आधारीत आपण उमेदवारांची यादी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे दिली होती. अमित शाह यांनीही तीन सर्वेक्षणे केली आणि 95 टक्के उमेदवार योग्य असल्य़ाचे लक्षात आल्यावर त्यांनी तिकीटवाटप केले. अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याबरोबर सभेसाठी आलेच पाहिजे अशी अपेक्षा केलेली नाही. वेगवेगळा प्रचार केल्याने अधिकाधिक भागांमध्ये जाऊन प्रचार करणं सोपं जात असल्याचे'' येडीयुरप्पा म्हणाले.
येडीयुरप्पा यांचा मुलगा विजयेंद्र याला तिकीट नाकारल्याबद्दल बोलताना येडीयुरप्पा म्हणाले, तो पक्षाचा निर्णय होता. मी पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार असल्यामुळे माझ्या कुटुंबातच आणखी एक तिकीट देऊ नये असा निर्णय झाला. विजयेंद्रला म्हैसूर आणि चामराजनगर येथिल प्रचाराची जबाबदारी दिली आहे.