येवल्यात 80 टक्के खत पडून
By admin | Published: July 13, 2017 05:28 PM2017-07-13T17:28:24+5:302017-07-13T23:54:35+5:30
खत विक्र ेते चिंतेत :पावसाअभावीपेरण्यालांबल्यानेबळीराजाहवालदिल
खत विक्र ेते चिंतेत :पावसाअभावीपेरण्यालांबल्यानेबळीराजाहवालदिल
येवला : (दत्ता महाले)
येवला शहर व तालुक्यात पावसाने दडी मारल्याने खत विक्र ेत्याचे खरेदी केलेल्या खतापैकी सुमारे ८० टक्के खते शिल्लक पडले आहेत. पावसाअभावी पेरण्या लांबत असल्याने शेतकर्यांनी खतेच उचलली नाहीत. शेतकर्यांनी पाऊस नसल्याने खते घालण्याचे नियोजन पुढे ढकलल्याने बहुतांशी विक्र ेत्याची गोदामे खतांनी तशीच भरलेली आहेत. पिके उतरून पडली आहे. लवकर पाऊस नाही पडला, तर या खतांचे करायचे काय, याच चिंतेत शहर व तालुक्यातील खत विक्र ेते आहेत.
----------------
पावसाने केला अपेक्षाभंग
यंदा हवामान खात्याने जोरदार पावसाचीही शक्यता वर्तिवली होती. पहिल्या टप्प्यात पेरणी योग्य पाऊस झाला. पुढे देखील मोठा पाऊस पडेल या अपेक्षेने खतविक्र ेत्यांनी या वर्षीच्या पेरणीचा अंदाज घेत व वाढलेले मका, कपाशी, सोयाबीन, बाजरी, भुईमुग हे क्षेत्र पाहून मोठ्या प्रमाणात रासायनिक खते खरेदी करून स्टॉक करून ठेवला. पिहल्या पंधरवाड्यात पावसाची भुरभुर होती. त्यामुळे तालुक्यातील 80 टक्के शेतकर्यांनी पेरण्या आटोपल्या. मात्र दुसर्या टप्प्यात पावसाचा काहीसा जोर चढेल असे वाटत असतानाच सर्वत्र कडक ऊन पडत असल्याने पेरण्यांची गती प्रचंड मंदावली. झालेल्या पेरण्याच संकटात आल्याने शेतकर्यांनी खतांकडे दुर्लक्षच केले. यामुळे खतांच्या दुकानांत शुकशुकाट पसरला. याचा परिणाम खत विक्र ेत्यांच्या जुलै मिहन्याच्या व्यवहारावर झाला आहे. जूनमध्ये शेतकर्यांनी खताची दुकाने फुललेली दिसली मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकरी खताच्या दुकानाकडे फिरकताना देखील दिसेना. या दिवसात नवी- जुनी देणी क्लीअर करून शेतकरी खते शेतात नेण्यासाठी धडपडत असतात. परंतु यंदा पाऊसच नसल्याने सगळ्या खतांच्या दुकानात शुकुशकाट आहे. परिणामी खतांची विक्र ी कशी करायची, या चिंतेत विक्र ेते आहेत. कोट्यावधी रु पयाची उलाढाल असणारा खते बि बीयाणाचा बाजार सध्या ठप्प आहे. लांबलेला पाऊस आणि आर्थिक विवंचनेत असलेला शेतकर्याने बियाणे खरेदीसाठी हात आखडला आहे. आतापर्यंत केवळ 60 टक्केच बियाण्यांची विक्र ी झाल्याची माहीती बियाणे विक्र ेत्यांनी दिली. मागील वर्षी याच काळात जवळपास 85 टक्के बियाणाची विक्र ी झाली होती. पुन्हा एखादा दमदार पाऊस झाल्यानतंर शेतकरी बियाणे व खते खरेदीला प्रारंभ करतील त्यानंतरच गर्दी वाढेल अशी अपेक्षा खत विक्र ेत्यांना आहे. .
गतवर्षी खरीप व रब्बी हंगामात चांगला पाऊस झाला. मात्र शेतकर्यांनी पिकवलेल्या शेतीमालाला रास्त भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी पूर्णत: उध्वस्त झाला आहे. घेतलेले बँकांचे कर्जही परतफेड करू शकला नाही. यंदाच्या या अस्मानी संकटामुळे पुन्हा शेतकर्या समोर पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. हातात पैसा नाही आणि कर्जही मिळत नाही. अशा विवंचनेत शेतकरी आहे. खरीप हंगामासाठी मशागत करून शेती सज्ज आहे. मात्र पावसाचा पत्ता नाही. मागील वर्षी मृग नक्षत्रात 100 टक्के शेतकर्यांच्या पेरण्या आटोपल्या होत्या. यावर्षी मृग नक्षत्रात थोडाफार पावसाने शेतकर्याच्या आशा पल्लवित झाल्या व त्यांनी या तडाख्यात 80 टक्के पेरण्या केल्या. मात्र आर्द्रा व पुनर्वसू नक्षत्र सध्या कोरडे जात असून उन्हाचा तडाखा कमी झाला नाही. त्यामुळे शेतकरी अद्यापही बी-बियाणे खरेदी करण्याच्या मानिसकतेत दिसत नाही. त्यामुळे कृषी केंद्र ओस दिसत आहेत. कृषी केंद्रचालकांनी उन्हाळ्यात मोठय़ा प्रमाणात बियाण्यांचे बुकींग केले. कपाशी सोयाबीनच्या बियाण्यांनी कृषी केंद्र हाऊसफुल्ल झाले आहे. मात्र खरेदीसाठी शेतकरीच दिसत नाही. शेतकर्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. चार एकराच्या आतील शेतकरी वेळेवर खत बि बीयाणे खरेदी करतो. सध्या शेतकरी बी-बियाण्यांची चाचपणी करीत आहे. एखादा चांगला पाऊस झाला म्हणजे खते बियाणे खरेदीला वेग येईल. सध्यातरी शेतकर्यांमध्ये खरेदीसाठी उत्साह दिसत नाही.
-----------
जूनच्या पहिल्या पंधरवड्यात आमची गोदामे मोकळी होतात. पण सध्या पाऊस नसल्याने खतांची मागणी क्वचितच होत आहे. जूनच्या मागणीच्या तुलनेत दहा टक्केही मागणी नाही. यामुळे आमच्या अर्थकारणावरच परिणाम झाला आहे. त्यात नोटबंदी व शेतमालाचा भाव गडगडला आणि जीएसटी मुळे शेतकरी हैराण झाला असून कदाचित पाऊस पडल्यानंतरच खते करण्याच्या मानिसकतेत आहे.
प्रदीप जाधव, संचालक भारत सीड्स, येवला.
=====================================
शेतकर्यांना जीएसटी मुळे खतांच्या किमत्तीवर 7 टक्के कार आकाराला जात होता.परंतु जीएसटी लागू झाल्यानंतर 5 टक्के कार आकारणी झाली.खतांच्या किमती काही प्रमाणात कमी झाल्याने,शेतकर्यांना अल्पसा दिलासा मिळाला असला तरी नोटबंदी,शेतमालाला भाव नाही,त्यामुळे पैसा हाती नाही.शिवाय पाऊस नाही त्यामुळे खतांच्या दुकानात शेतकरी दिसत नाही.