येवला डॉ. आंबेडकर जयंती बातमी -जोड

By admin | Published: April 15, 2016 01:55 AM2016-04-15T01:55:18+5:302016-04-15T22:59:16+5:30

येवला -

Yeola Dr. Ambedkar Jayanti News -Jod | येवला डॉ. आंबेडकर जयंती बातमी -जोड

येवला डॉ. आंबेडकर जयंती बातमी -जोड

Next

येवला -
साताळी ग्रामपंचयत :- साताळी ग्रा पं मध्ये भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ व्या जयंती निमीत्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस सरपंच भाऊसाहेब कळसकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्ताजी काळे , उपसरपंच शहाजीराजे काळे, कचरू कोकाटे, राधाकीसन आहेर, गणेश कोकाटे, वाल्मीक काळे, तुषार सोनवणे, वसंत मोरे, निलेश सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थीत होते.
उंदीरवाडी ग्रामपंचायत- उंदीरवाडी ग्रामपंचायत कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सरपंच संगीता सोनवणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी डॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने ग्रामपंचायतीच्या वतीने समाजमंदिरास रंग देणे कामी २ हजार ३०० रु पयाचा धनादेश देण्यात आला. सरपंच संगीता सोनवणे, सचिन कळमकर, अनिल झाल्टे, प्रमोद बोडके, यांची समायोजित भाषणे झाली. जयंती निमित्ताने समाज मंदिरात वाचण्यासाठी पुस्तके ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. कार्यक्र मास संजय देशमुख, विनोद जेजुरकर, मंदाबाई सोनवणे, ज्ञानेश्वर मडाळकर, अमति कळमकर, किसन मास्तर, बाबासाहेब धीवर, राजेंद्र झाल्टे, लक्ष्मण झाल्टे, बापू क्षीरसागर, दत्तात्रय राजुळे, दत्तात्रय सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

न्यू इंग्लिश स्कूल, भारम विद्यालयात- येथील न्यू इंग्लिश स्कूल, भारम विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त विद्यालयाचे मुख्याध्यापक मंगेश नागपुरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी. यावेळी विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर भाषणे केली. याप्रंसंगी डी.डी. पैठणकर, पी.एम.पैठणकर, संदीप जाधव आदीसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Yeola Dr. Ambedkar Jayanti News -Jod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.