हो मी पंचकुलात हिंसा भडकावली ! हनीप्रीतने मान्य केला आपल्यावरील आरोप, 35 जणांचा झाला होता मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 12:10 PM2017-10-11T12:10:05+5:302017-10-11T12:14:48+5:30

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला 25 ऑगस्ट रोजी बलात्काराच्या आरोपाखाली न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर हरियाणामधील पंचकुला येथे हिंसा भकडल्यानंतर 35 हून जास्त जणांचा मृत्यू झाला होता. हिंसेप्रकरणी मुख्य आरोपी असलेली राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतने आपल्यावरील आरोप मान्य केले आहेत अशी माहिती मिळत आहे.

Yes, Panchkula Violence Violence! Honeypreet agreed that the charges against him, 35 were deaths | हो मी पंचकुलात हिंसा भडकावली ! हनीप्रीतने मान्य केला आपल्यावरील आरोप, 35 जणांचा झाला होता मृत्यू

हो मी पंचकुलात हिंसा भडकावली ! हनीप्रीतने मान्य केला आपल्यावरील आरोप, 35 जणांचा झाला होता मृत्यू

Next
ठळक मुद्देहरियाणामधील पंचकुला येथे हिंसा भकडल्यानंतर 35 हून जास्त जणांचा मृत्यू झाला होताहिंसेप्रकरणी मुख्य आरोपी असलेली राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतने आपल्यावरील आरोप मान्य केले आहेतहनीप्रीतने पंचुकला हिंसेत आपला हात असल्याची कबुली दिली आहे अशी माहिती मिळत आहे

चंदिगड - डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला 25 ऑगस्ट रोजी बलात्काराच्या आरोपाखाली न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर हरियाणामधील पंचकुला येथे हिंसा भकडल्यानंतर 35 हून जास्त जणांचा मृत्यू झाला होता. हिंसेप्रकरणी मुख्य आरोपी असलेली राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतने आपल्यावरील आरोप मान्य केले आहेत अशी माहिती मिळत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हनीप्रीतने पंचुकला हिंसेत आपला हात असल्याची कबुली दिली आहे. 

3 ऑक्टोबर रोजी हरियाणा पोलिसांनी हनीप्रीत आणि तिच्या एका महिला सहकारी सुखदीप कौरला पंजाबजवळील जिरकपूर परिसरातून अटक केली. 4 ऑक्टोबर रोजी पंचकुला येथील न्यायालयात हनीप्रीत आणि सुखदीप यांना हजर केलं असता सहा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. हनीप्रीत एक महिन्यापासून फरार होती. गुरमीत राम रहीमला दोषी ठरवण्यात आल्यानंतर भडकलेल्या हिंसेप्रकरणी 43 जणांवर आरोप ठेवण्यात आला असून, हनीप्रीतचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. 

डेरा हिंसा प्रकरणाचा तपास करणा-या विशेष तपास पथकाने (एसआयटी) गुरमीत राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीत आणि खासगी सचिव राकेश कुमार यांची कसून चौकशी केली होती. रविवारी करण्यात आलेल्या चौकशीत हिंसेप्रकरणी अनेक प्रश्न दोघांना विचारण्यात आले. एसआयटीचे डीसीपी मनबीर सिंह यांनी चौकशीसंबंधी अधिक माहिती दिलेली नव्हती. मात्र डीजीपी बीएस संधू यांनी यासंबंधी काही माहिती देत, नवी आणि अधिक माहिती हाती आल्याचा दावा केला होता. आरोपींना जेलमध्ये पाठवण्यात आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी माहिती शेअर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. 

पंचकुलामधील सेक्टर-23 पोलीस स्थानकात एसआयटीने जवळपास पाच तास हनीप्रीतची चौकशी केली. पाच तासांच्या चौकशीनंतर हनीप्रीत आपल्याला अस्वस्थ वाटत असल्याचं सांगू लागली. यानंतर एसआयटीने आपली चौकशी थांबवली. हनीप्रीतला एका अज्ञातस्थळी नेण्यात आलं. 

शनिवारी राकेश कुमारला न्यायालयात हजर केलं असता, पोलीस कोठडी दोन दिवसांनी वाढवण्यात आली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डेरा हिंसामध्ये हनीप्रीतने महत्वाची भूमिका निभावल्याची कबुली राकेशने दिली. हनीप्रीतने हिंसा करण्यासाठी पुर्ण योजना आखली होती. हिंसेमुळे 30 जणांचा मृत्यू झाला होता, तसंच सार्वजनिक संपत्तीचं मोठं नुकसान झालं होतं. दरम्यान 25 ऑगस्ट रोजी पंचकुला येथे दंगल झाल्यानंतर पुढील 38 दिवस हनीप्रीत नेमकी कुठे होते, तिला पैसे कुठून मिळाले याची माहितीदेखील पोलिसांना मिळवायची आहे. 

मागच्या महिन्याभरापासून फरार असलेल्या हनीप्रीत इन्साने अखेर 3 ऑक्टोबर रोजी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. ती हरियाणा पोलिसांच्या ताब्यात आहे. हनीप्रीत बाबा गुरमीत राम रहीमची दत्तक मुलगी आहे. राम रहीम साध्वींवरील बलात्कार प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. हनीप्रीतने आत्मसमर्पण करण्याआधी माध्यमांना मुलाखती दिल्या. त्यात तिने आपली बाजू मांडली. 

राम रहीम आणि ती पूर्णपणे निर्दोष असल्याचा दावा तिने केला. वडिलांबरोबर आपल नातं पवित्र असल्याचं हनीप्रीतने या मुलाखतीत सांगितलं. हनीप्रीतचा पूर्वपती विश्वास गुप्ताने हनीप्रीतचे राम रहीमबरोबर अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. मी राम रहीम आणि हनीप्रीतला एकत्र नेकेड,  सेक्स करताना बघितले होते असे विश्वास गुप्ताने पत्रकार परीषदेत सांगितले होते. 

Web Title: Yes, Panchkula Violence Violence! Honeypreet agreed that the charges against him, 35 were deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.