होय...आमच्या लष्कराचा कारगिल युद्धात सहभाग होता; पाकिस्तानची प्रथमच कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2024 06:36 AM2024-09-08T06:36:58+5:302024-09-08T09:26:04+5:30

पाक लष्करप्रमुख जन. असीम मुनीर यांचाच कबुलीनामा, भारताच्या सत्यकथनावर शिक्कामोर्तब

Yes...our army was involved in Karagal war; Pakistan Army admits role in Kargil War | होय...आमच्या लष्कराचा कारगिल युद्धात सहभाग होता; पाकिस्तानची प्रथमच कबुली

होय...आमच्या लष्कराचा कारगिल युद्धात सहभाग होता; पाकिस्तानची प्रथमच कबुली

इस्लामाबाद : १९९९च्या कारगिल गेले. युद्धामध्ये पाकिस्तान सहभागी होता याची पाकिस्तानच्या लष्कराने जन. असीम मुनीर पहिल्यांदाच जाहीर कबुली दिली आहे. पाकिस्तानच्या संरक्षण दिनानिमित्त रावळपिंडी येथे आयोजिलेल्या कार्यक्रमात पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी स्वतः ही कबुली दिली. १९४८, १९६५, १९७१ तसेच १९९९मधील कारगिलच्या युद्धात अनेक पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला, असेही जनरल मुनीर यांनी कबुल केले.

कारगिल भागात घुसलेल्या पाकिस्तानी सैनिकांना हुसकावून लावण्यासाठी भारतीय लष्कराने त्यातील अनेकांचे मृतदेह पाकिस्तानने ताब्यात घेतले नव्हते. त्यामुळे भारतीय लष्करानेच या सैनिकांच्या मृतदेहांवर अंतिम संस्कार केले होते. पाकिस्तानने आपल्या काही सैनिकांचे मृतदेह जाहीरपणे नव्हे तर लपूनछपून ताब्यात घेतल्याच्या बातम्या कारगिल युद्धानंतर झळकल्या होत्या. कारगिल युद्धात आमचा सहभाग नव्हता अशीच भूमिका आजवर पाकिस्तानी लष्कराने घेतली होती. मात्र आता जनरल मुनीर यांनी पाकिस्तानच्या कारगिल युद्ध सहभागाची कबुली दिल्याने भारत यासंदर्भात सत्य सांगत होता हे सिद्ध झाले आहे. नियंत्रण रेषेनजीक भारतीय हद्दीत ज्या चौक्यांवर पाकिस्तानने कब्जा केला होता.

सैन्य माघारीची क्लिंटन यांची पाकला सूचना

कारगिल येथून आपले लष्कर माघारी बोलविण्याचा आदेश पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांनी द्यावा, अशी सूचना अमेरिकेचे त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लेिटन यांनी केली होती. तीन महिने चाललेल्या कारगिल युद्धात भारताचे ५४५ जवान शहीद झाले होते.

पाकिस्तानविरुद्ध भारताने दिले पुरावे

कारगिल युद्धात पाकिस्तानचे लष्कर सहभागी असल्याचे अनेक पुरावे भारताने दिले होते. पाकिस्तानी सैनिकांची पेबुक, त्यांचे गणवेश, शस्त्रे यांचा त्यात समावेश होता. मात्र भारताने सादर केलेले पुरावे खोटे आहेत असाच कांगावा पाकिस्तान करत राहिला.

Web Title: Yes...our army was involved in Karagal war; Pakistan Army admits role in Kargil War

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.