‘यिप्पी’ नूडल्सही धोकादायक?

By admin | Published: August 23, 2015 11:25 PM2015-08-23T23:25:11+5:302015-08-23T23:25:28+5:30

मॅगीनंतर आता ‘यिप्पी’ या आणखी एका जनमानसात लोकप्रिय असलेल्या नूडल्स ब्रांड कंपनीवर कारवाईची तलवार लटकत आहे. ‘यिप्पी’ नूडल्सच्या

'Yippies' noodles are dangerous? | ‘यिप्पी’ नूडल्सही धोकादायक?

‘यिप्पी’ नूडल्सही धोकादायक?

Next

अलिगड (उ.प्र.) : मॅगीनंतर आता ‘यिप्पी’ या आणखी एका जनमानसात लोकप्रिय असलेल्या नूडल्स ब्रांड कंपनीवर कारवाईची तलवार लटकत आहे. ‘यिप्पी’ नूडल्सच्या नमुन्यात शिशाचे अत्याधिक प्रमाण आढळल्यानंतर उत्तर प्रदेश अन्न व औषधी प्राधिकरणाने गुन्हा दाखल करण्याची तयारी चालवली आहे.
एफडीएच्या अलिगड विभागाचे प्रमुख चंदन पांडे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. २१ जूनला एका स्थानिक शॉपिंग मॉलमधून ‘यिप्पी’ नूडल्सचे आठ नमुने घेऊन ते लखनौ तसेच मेरठच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. या आठही नमुन्यांत शिशाचे प्रमाण निर्धारित मात्रेपेक्षा अधिक आढळून आले आहे.

Web Title: 'Yippies' noodles are dangerous?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.