Yoga at Office Chair : डीए हाइकपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! मोदी सरकारनं केली मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 11:27 AM2023-06-15T11:27:24+5:302023-06-15T11:29:30+5:30
यात कर्मचाऱ्यांना आपल्या ऑफीसमधील जागेवरच योग करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
या योग दिवशी आपण सरकारी कार्यालयात गेलात आणि तेथे कर्मचारी योग करताना दिसले, तर आश्चर्यचकित होण्याचे कारण नाही. कारण, केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना डी-स्ट्रेस, रिफ्रेश आणि रीफोकस होण्यासाठी शॉर्ट टाइम 'वाय ब्रेक' (Y-Break) अर्थात 'योगासाठी वेळ' घेण्याचा सल्ला दिला आहे. यात कर्मचाऱ्यांना आपल्या ऑफीसमधील जागेवरच योग करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कार्यालयातील कामाच्या जागेवरच योग करण्याचा सल्ला -
कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात, केंद्र सरकारची सर्व मंत्रालये आणि विभागांना कामाच्या ठिकाणीच योग प्रोटोकॉलचा अवलंब आणि प्रचार करण्यास सांगितले आहे. यासंदर्भात एक अधिसूचना जारी करून कार्यालयातील खुर्चीवर बसूनच योगा करण्यास सांगण्यात आले आहे. मोदी सरकारने आंतरराष्ट्रीय योग दिवसापूर्वी (International Yoga Day) केंद्रीय कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामातून वेळ काढून Y ब्रेक घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कर्मचाऱ्यांना फीट ठेवणे हा हेतू -
आयुष मंत्रालयाकडून कामाच्या जागेवर कर्मचाऱ्यांना Y-ब्रेक घेण्याचा सल्ला डी-स्ट्रेस, रिफ्रेश आणि री-फोकस्डसाठी देण्यात आला आहे. यासाठी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना प्रोत्साहित करण्यात आले आहे. सरकारने जारी केलेल्या आदेशात, 'Y-Break@workplace-योगा एट चेअर'संदर्भात जनजागृती पसरवण्यासाठी भारत सरकारमधील सर्व मंत्रालयांना आणि विभागांना आवाहन करण्यात आले आहे. या आदेशात यूट्यूबवरील खालील लिंक्सचा उल्लेख करण्यात आला आहे.
https://youtu.be/2zBEUqc7nCc
https://youtu.be/aqYJR8HnSJI
https://youtu.be/I8YBnxWjHbg
https://youtu.be/1qQQ3yUjnyM
या वरील लिक्समध्ये काही सामान्य प्रकारचे योग सांगण्यात आले आहेत. जे थोडा वेळ काढून केले जाऊ शकतात. तसेच मंत्रालयाने आपल्या प्रोटोकॉलमध्ये सिंपल योगाभ्यास सांगितला आहे. यात आसन, प्राणायाम आणि ध्यानाचा समावेश आहे.