अमेरिका, चीन, फ्रान्स, दक्षिण आफ्रिकेत योग दिनाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 04:06 AM2018-06-18T04:06:57+5:302018-06-18T04:06:57+5:30
२१ जून रोजी साजरा करण्यात येणाऱ्या चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी म्हणून अमेरिका, चीन, इटली, फ्रान्स, दक्षिण आफ्रिका यासह आणखी काही देशांत योगविषयक कार्यक्रमांना प्रारंभ झाला आहे.
नवी दिल्ली- २१ जून रोजी साजरा करण्यात येणाऱ्या चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी म्हणून अमेरिका, चीन, इटली, फ्रान्स, दक्षिण आफ्रिका यासह आणखी काही देशांत योगविषयक कार्यक्रमांना प्रारंभ झाला आहे. त्यातून योगविद्येची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविली जात आहे.
>177 देशांनी दिला होता पाठिंबा
आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याची मूळ कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची. त्यांनी केलेल्या विनंतीचा स्वीकार करुन संयुक्त राष्ट्रांनी दरवर्षी २१ जूनला हा दिवस साजरा करण्याचा निर्णय २०१४ साली घेतला. यासंदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये आलेल्या प्रस्तावाला १७७ देशांनी पाठिंबा दिला होता.अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे गव्हनर्स आयलंड इथे शनिवारी आयोजिलेल्या योग शिबीरात शेकडो लोक सहभागी झाले होते. याप्रसंगी भारताचे अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरातील कॉन्सुलेट जनरल संदीप चक्रवर्ती उपस्थित होते.