पतंजलीच्या मार्चमध्ये खरेदी केलेल्या प्रोडक्टवर एप्रिल महिन्याची उत्पादन तारीख? चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2018 11:35 AM2018-05-02T11:35:19+5:302018-05-02T11:35:19+5:30

पतंजलीने मात्र त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.

yoga guru baba ramdev patanjali ayurveda product found with post manufacturing date | पतंजलीच्या मार्चमध्ये खरेदी केलेल्या प्रोडक्टवर एप्रिल महिन्याची उत्पादन तारीख? चौकशीचे आदेश

पतंजलीच्या मार्चमध्ये खरेदी केलेल्या प्रोडक्टवर एप्रिल महिन्याची उत्पादन तारीख? चौकशीचे आदेश

googlenewsNext

नवी दिल्ली- योगगुरू बाबा रामदेव आणि त्यांची पंचजली आयुर्वेद कंपनी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पंतजलीच्या उत्पादनावर पुढील महिन्याची उत्पादन तारीख छापल्याचा कंपनीवर आरोप करण्यात आला आहे. मार्च महिन्यात बाजारात विक्रीसाठी आलेल्या एका वस्तूवर एप्रिल 2018 ही उत्पादन तारीख छापण्यात आली. सोशल मीडियावर लोकांनी त्या उत्पादनाचे फोटो पोस्ट करून हा दावा केला आहे.  भारतीय खाद्य नियामक संस्थाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सने बाबा रामदेव व पतंजली कंपनीला चांगलंच धारेवर धरलं. 

पतंजलीच्या एका औषधाच्या डब्यावर एप्रिलची उत्पादन तारीख होती. पण तो औषधाचा डबा मार्चमध्ये बाजारात आला होता, असं एका ट्विटर युजरने म्हटलं आहे. सोशल मीडियावर नेटिझन्सने औषधाच्या या डब्याचा फोटो शेअर कर एफएसएसआय आणि डब्ल्यूएचओला टॅग केलं. 







 

दरम्यान, पतंजलीने मात्र त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. आरोप खोटे असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. औषधाच्या डब्यावरील तारीख फोटोशॉप करून टाकली आहे, असं स्पष्टीकरण कंपनीने दिलं आहे. 

Web Title: yoga guru baba ramdev patanjali ayurveda product found with post manufacturing date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.