कोविडविरुद्ध योग आशेचा किर; जगाच्या कानाकोपऱ्यात योग करणारे लोक वाढले- पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 06:13 AM2021-06-22T06:13:05+5:302021-06-22T06:13:11+5:30
जगाच्या कानाकोपऱ्यात योग करणारे लोक वाढले
नवी दिल्ली : “कोविड-१९ महामारीशी लढण्यासाठी योग हा आशेचा किरण आणि शक्तीचा स्रोत आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी म्हटले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना मोदी म्हणाले की, रुग्णालयांत डॉक्टर्स आणि परिचारिका योग सत्र घेत असल्याची आणि श्वासोच्छ्वास यंत्रणा बळकट होण्यासाठी तज्ज्ञ लोक योगिक श्वासोच्छ्वास व्यायाम करण्यावर भर देत असल्याची अनेक उदाहरणे आहेत.
संपूर्ण जग कोरोना विषाणूशी लढत असताना योग हा आशेचा किरण बनलेला आहे. गेल्या दीड वर्षांत जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात योग करणारे लाखो लोक वाढले आहेत. मोदी यांनी महामारीच्या लढ्याचा संबंध योग अभ्यासाशी लावून ‘हू’च्या सहयोगाने ‘एम-योगा’ हे ॲप्लिकेशन जाहीर केले.
जगाला भारताने दिली महान भेट
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी योगाचे वर्णन जगाला भारताने दिलेली एक महान भेट अशा शब्दांत केले. राष्ट्रपती भवनने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा. आमच्या प्राचीन सिद्धपुरुषांनी सर्वंकष आरोग्य आणि आनंद प्राप्त करण्यासाठी मन आणि शरीर एकत्र आणण्यासाठीच्या दृष्टीने सांगितलेल्या योगाचा दशलक्षावधी लोकांना फायदा झाला आहे.