योगेंद्र यादव जवळचे सहकारी - केजरीवाल

By admin | Published: June 7, 2014 02:50 PM2014-06-07T14:50:23+5:302014-06-07T17:42:24+5:30

योगेंद्र यादव हे जवळचे मित्र आणि महत्वाचे सहकारी असल्याचे सांगत 'आप'चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पक्षात सुरू झालेले वाद मिटवण्याचे प्रयत्न सुरू केला आहे.

Yogendra Yadav close aide - Kejriwal | योगेंद्र यादव जवळचे सहकारी - केजरीवाल

योगेंद्र यादव जवळचे सहकारी - केजरीवाल

Next
>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ७ - योगेंद्र यादव हे जवळचे मित्र आणि महत्वाचे सहकारी असल्याचे सांगत 'आप'चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पक्षात सुरू झालेले वाद मिटवण्याचे प्रयत्न सुरू केला आहे. आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान पहिल्या फळीतील नेत्यांची भांडणे चव्हाट्यावर आल्याने पक्षातील वाद वाढल्याचे चित्र दिसत होते. त्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी ट्विट करत 'योगेंद्र यादव हे माझे जवळचे मित्र व महत्वाचे सहकारी आहेत. त्यांनी उपस्थित केलेल्या काही महत्वाच्या मुद्यांवर आम्ही सर्वजण काम करत आहोत,' असे म्हटले आहे. तसेच राजीनामा देऊन पक्षाबाहेर पडलेल्या शाजिया इल्मी यांना पुन्हा पक्षात आणण्याचे प्रयत्न करू असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे. 
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पक्षात वाद उफाळून आले होते. मनीष सिसोदिया आणि योगेंद्र यादव यांनी शुक्रवारी परस्परांवर तोफ डागल्याने पक्षांतर्गत संघर्ष पेटल्याचे समोर आले होते.   यादव यांनी आपची राजकीय व्यवहार समिती आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचा राजीनामा देत केजरीवाल हे नेते नव्हे तर, पक्षाचे सर्वेसर्वा म्हणून वागत असल्याचा आरोप एका पत्रात केला होता. तर दुसरीकडे सिसोदिया यांनी पत्रात यादव हे हरियाणातील आपचे नेते नवीन जयहिंद यांच्यासोबतच्या संघर्षातून पक्षनेतृत्वाला या वादात ओढत असल्याचा आरोप केला होता.

Web Title: Yogendra Yadav close aide - Kejriwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.