देशभक्तीपर गीतात योगेश्वर दत्तचा देशद्रोह्यांवर हल्ला
By admin | Published: February 17, 2016 07:06 PM2016-02-17T19:06:59+5:302016-02-17T19:06:59+5:30
दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात गेल्या आठवड्यात घडलेल्या पार्श्वभूमीवर भारतीय कुस्तीपटू योगेश्वर दत्त याने देशभक्तीवर गीत लिहून देशद्रोह्यांवर हल्ला चढवला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात गेल्या आठवड्यात घडलेल्या पार्श्वभूमीवर भारतीय कुस्तीपटू योगेश्वर दत्त याने देशभक्तीवर गीत लिहून देशद्रोह्यांवर हल्ला चढवला आहे.
गेल्या आठवड्यात जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी संसदेवर हल्ल्या केल्याप्रकरणी फासावर लटकवण्यात आलेल्या अफझल गुरूच्या समर्थनार्थ देशविरोधी घोषणा दिल्या. याप्रकरणी २०१२ मधील ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळविणा-या योगेश्वर दत्तने देशभक्तीवर गीत लिहून देशद्रोह्यांच्या विरोधात एकप्रकारे हल्लाच केला आहे. सध्या त्याने केलेले देशभक्तीवरील गीत सोशल मिडीयात व्हायरल झाले असून सर्वांकडून त्याला चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत.
किन लोगों के लिए सेना के जवान जान की बाज़ी लगा रहे हैं और किन लोगों के गर्व के लिए खिलाड़ी दिन रात पसीना बहा रहे हैं pic.twitter.com/hMqKNdjxkE
— Yogeshwar Dutt (@DuttYogi) February 13, 2016