उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला किती जागा मिळणार? CM योगी आदित्यनाथांनी सांगितलं गणित

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 09:56 PM2021-06-23T21:56:58+5:302021-06-23T21:58:26+5:30

उत्तर प्रदेशात पुढी वर्षी म्हणजेच 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठा दावा केला आहे.

Yogi Adityanath claims bjp will win more than 300 seats in uttar pradesh | उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला किती जागा मिळणार? CM योगी आदित्यनाथांनी सांगितलं गणित

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला किती जागा मिळणार? CM योगी आदित्यनाथांनी सांगितलं गणित

Next

लखनौ - उत्तर प्रदेशात पुढी वर्षी म्हणजेच 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठा दावा केला आहे. भाजप 2022 च्या विधानसभा निवडणुकीत 300 हून अधिक जागा जिंकेल, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. (Yogi Adityanath claims bjp will win more than 300 seats in uttar pradesh)

यावेळी योगी आदित्यनाथांनी दावा केला, की उत्तर प्रदेशात 40 लाख लोकांना घर देण्यात आले आहे. दोन कोटीहून अधिक लोकांना शौचालये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. उत्तर प्रदेश विधानभा निवडणुकीत भाजप 300 हून अधिक जागा जिंकेल. यात कसलीही शंका नाही. ते म्हणाले, आता उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था एक उदाहरण बनले आहे. यूपीत अनावश्यक घटकांना स्थान नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबरोबरच तरुणांना नोकरी देण्यापर्यंत राज्यात अनेक कामे झाली आहेत. अनेक योजनांच्या माध्यमाने तरुणांना रोजगार देण्यात आला आहे. आता उत्तर प्रदेशात सर्वात कमी बेरोजगारी दर दिसत आहे. 

UP Election: फेसबुकवर योगी आदित्यनाथ यांच्यापेक्षा अखिलेश यादव अधिक पॉप्युलर!; हे आकडे काय दर्शवतात?

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तयारी सुरू -
सीएम योगी म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान लोकांना तात्पूरता त्रास झाला. मी अजूनही म्हणत आहे, की कोरोना नियंत्रणात आहे. पण अद्याप व्हायरस कमजोर झालेला नाही. यामुळे सावध राहण्याची आश्यकता आहे. ज्या दिवशी यूपीत कोरोना पीकवर पोहोचला होता, त्या दिवशी 38 हजार रुग्ण आढळले होते. योगी म्हणाले, सप्टेंबर 2020 मध्ये आम्ही कोरोना नियंत्रणात आणला होता. ऑक्टोबरमध्ये अयोध्येत दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. याच बोरब लोकांना 'दो गज दूरी, मास्क है जरूरी', असा संदेशही देण्यात आला. उत्तर प्रदेशात एक दिवस केवळ 85 रुग्णच आढळले होते. मात्र, आपण टेस्टिंग सातत्याने वाढवत राहिलो.

Religious conversion case: 1000 हून अधिक लोकांचे धर्मांतरण! योगी सरकारची स्ट्रिक्ट अ‍ॅक्शन, दिले मोठे आदेश 

मुख्यमंत्री योगी म्हणाले, आम्ही कोरोनाच्या तिसऱ्यालाटेच्या दृष्टीनेही तयारी सुरू केली आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बोलले जात आहे, की ही लाट मुलांना अधिक प्रभावित करेल. यामुळे मुलांची चार गटांत विभाजन करून देखरेख समित्या सक्रिय झाल्या आहेत. तसेच वृद्धांच्या लसीकरणालाही गती देण्यात आली आहे.

Web Title: Yogi Adityanath claims bjp will win more than 300 seats in uttar pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.